Lemon Canva
महाराष्ट्र

Lemon Price High : उन्हाचा पारा वाढताच लिंबूला आला भावा; 50 ते 70 रुपये किलो असलेला लिंबू पोचला 160 वर

Lemon Price High : त्यामुळे लिंबूची मागणी देखील मोठ्याप्रमाणात वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात 35 ते 41 पर्यंत तापमानाचा पारा गेला आहे.

Ruchika Jadhav

सागर निकवाडे, नंदुरबार

Lemon Price High :

राज्यात सर्वत्र उन्हाचा कहर वाढला आहे. उन्हाळ्यात सर्वच नागरिक घरच्याघरी सरबत बनवत असतात. सरबत बनवण्यासाठी सामान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच लिंबू सरबत प्यावे वाटते. लिंबू सरबतची मागणी उन्हाळ्यात वाढल्याने लिंबूच्या दरातही मोठी वाढ होत आहे. 50 ते 70 रुपये किलो असलेला लिंबू आता थेट 160 रुपये किलोवर पोहचला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याचं जाणवत आहे. नागरिक बर्फापासून तयार होणाऱ्या थंड पदार्थांना पसंती देत आहेत. त्यामुळे लिंबूची मागणी देखील मोठ्याप्रमाणात वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात 35 ते 41 पर्यंत तापमानाचा पारा गेला आहे.

काही दिवसांपूर्वी 50 ते 70 रू प्रति किलो लिंबू मिळत होता, मात्र तापमान वाढताच लिंबू चांगलाच भाव खायला लागला आहे. लिंबूच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे, यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे जास्तीचे पडू लागले आहेत. लिंबूला सध्या 150 ते 160 रुपये प्रति किलो दराने विकला जात असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाला आवक घटली,भाज्यांच्या दरात वाढ

नाशिक जिल्ह्याच्या कसमा पट्ट्यात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा हवालदिल झालाय. विहिरींनी तळ गाठला असून डिसेंबर-जानेवारीमध्ये उपलब्ध पाण्यावर भाजीपाला लागवड केली. मात्र सद्य परिस्थितीला पाणी कमी पडू लागल्याने भाजीपाल्याच्या आवकमध्ये घट झाली आहे. त्यामुळे वांगी, दोडकी, गिलके, कारले यांचे दर ६० रुपये किलो तर शेवगा,भेंडी,चवळी पन्नास रुपये किलोवर पोहचली आहेत. भाज्यांचे वाढते दर पाहता गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT