Legislative Council Election 
महाराष्ट्र

Legislative Council Election: मिलिंद नार्वेकर कुणाचा गेम करणार? मिलिंद नार्वेकरांच्या विजयाची भाजपला खात्री?

Legislative Council Election: विधानपरिषदेच्या निव़डणुकीत पराभूत होणार 12 उमेदवार कोण अशी जोरदार चर्चा सुरू झालीय. मविआचे मिलिंद नार्वेकर निवडून येतील असा विश्वास भाजपचेच नेते व्यक्त करतायत. त्यामुळे जयंत पाटलांचा विजय धोक्यात आलाय की काय अशी चर्चा रंगलीय.

Tanmay Tillu

महाराष्ट्रातील विधान परिषदेतील निवडणूकांमध्ये रंगत आली आहे. येत्या 12 जुलै रोजी निवडणूका आहेत. या निवडणुकीतील चुरस वाढली ती मिलिंद नार्वेकरांच्या एन्ट्रीनं. मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीनं निवडणुक अटळ झाली. त्यामुळे 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आले. त्यामुळे ठाकरेंच्या खेळीमुळे नवा ट्वीस्ट आलाय. तर दुसरीकडे भाजपचे आमदार प्रविण दरेकरांनीच नार्वेकरांच्या विजयाची खात्री व्यक्त केलीये. त्यावर शेकापच्या जयंत पाटलांनीही प्रतिक्रिया दिलीये.

मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीनं विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता बळावली आहे. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. गेली अनेक दशके ठाकरे घराण्याशी जवळीक असलेली आणि कौटुंबिक नातं असलेली व्यक्ती. बंडखोरीनंतरही नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबतच होते. मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून क्रॉस व्होटिंग होऊ शकते.त्यात मिलिंद नार्वेकर सर्व आमदारांच्या जवळची व्यक्ती आहे.

कोण आहेत नार्वेकर ?

उद्धव ठाकरेंचे सचिव

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू

उद्धव ठाकरेंची सावली म्हणूनही ओळख

सचिव मिलिंद नार्वेकरांवर एकही गुन्हा दाखल नाही

सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध

मिलिंद नार्वेकरांचे सर्वपक्षीय नेत्यांशी आणि आमदारांशी असलेले मैत्रिपूर्ण संबंध त्यांच्या विजयासाठी जमेच्या बाजू ठरण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेसकडील अतिरीक्त मतं नार्वेकरांना मिळू शकतात. यासाठी नार्वेकर स्वतः सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतायत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत प्रचंड क्रॉस व्होटींग झालं होतं. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पडले होते.याच रात्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते.

त्यानंतर अनेक नाट्यमय राजकीय घटना घडल्या. त्यामुळे विधानपरिषद निवडणुक चांगलीच लक्षात राहिली होती. त्यामुळे यंदा कोणाचा मोहरा कामी येतो याकडे लक्ष लागलंय..महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून येतील असे म्हटले जात आहे. जर मिलिंद नार्वेकर निवडून आले तर महायुतीचा उमेदवार पडेल आणि ते हारले तर ठाकरेंसाठी ही धोक्याची घंटा असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

SCROLL FOR NEXT