Ajit Pawar Sharad PAwar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाला मिळणार? कायदा काय सांगतो?; कायदेतज्ज्ञांचे मत

Maharashtra Political Crisis: कायदेशीरित्या पक्ष कुणाचा याबाबत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत मांडलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर पक्ष नेमका कुणाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. अजित पवार  गटाकडून सातत्याने पक्ष आमच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे कायदेशीरित्या पक्ष कुणाचा याबाबत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत मांडलं आहे.

राष्ट्रवादीतील फुटीवर त्यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष शरद पवार  यांच्याकडे तर विधीमंडळ पक्ष (Legislative Party) ही अजित पवार यांच्याकडे आहे. हे स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. विधीमंडळ पक्ष म्हणजे पार्टी नाही, हे देखील स्पष्ट आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना निवडणूक आयोगाकडे जावे लागेल.

मी १९७३ पासून महाविद्यालयात राज्यघटना शिकवतोय पण गेल्या काही दिवसांपासून घटनात्मक नैतिकतेची (Constitutional ethics) घसरण होत चालली आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला स्पष्ट दिशा दिली आहे की, चिन्ह आणि पक्ष कोणाचा हे सांगा. राष्ट्रवादी काँग्रेस या मूळ पक्षावर वर्चस्व कोणाचे हे आयोग सांगेल, असं उल्हास बापट यांनी म्हटलं. (Political News)

राष्ट्रवादी काँग्रेसची घटना शरद पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला निर्णय द्यावा लागेल. १६ आमदार अपात्र यांच्या निर्णयावरून कोर्टाने निर्धारित वेळ दिला. पण सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्र निर्णयाबद्दल एक विशिष्ट वेळ दिली पाहिजे होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

Maharashtra Assembly Election 2024: सावधान! मतदानासंदर्भात दिशाभूल करणारे संदेश पाठवाल तर होईल कडक कारवाई

IPL 2024 Mega Auction: IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

SCROLL FOR NEXT