- संजय राठोड
अपंगत्वाचे दुःख कुरवाळत न बसता परिस्थितीशी दोन हात करत लक्ष्मी विलास राठोड (laxmi vilas rathod passed mpsc exam) हिने एमपीएससीचा गड सर केला. छोट्याशा तांड्यात राहणाऱ्या मुलीने मिळवलेल्या या यशाने गाव आनंदून गेले. तिची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. शेकडो नागरिकांनी हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवला. (Maharashtra News)
लक्ष्मी किन्हाळा तालुका कळंब येथील गुणवंत मुलगी आहे. तिने पहिल्याच प्रयत्नात एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. यावेळीची कट ऑफ लिस्ट 135 गुणांवर जाहीर झाली. लक्ष्मीने तब्बल 188 गुण घेत कर्तृत्व सिद्ध केले.
अल्पदृष्टी दिव्यांग असलेली लक्ष्मी लहान असताना तिच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. घरी असलेली सात एकर कोरडवाहू शेती तिच्या आईने सांभाळली. आईला काहीच लिहिता वाचता येत नसले तरी तिने मुलांनी शिकून मोठं व्हावे यासाठी कबाड कष्ट केले. आईचे स्वप्न साकार करण्यासाठी लक्ष्मीने प्रयत्न सुरू केले.
तिने आठवीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. मोठ्या हिमतीने यवतमाळ येथे नववीसाठी प्रवेश घेतला. चांगले गुण मिळाल्याने तिला शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळाला त्यानंतर तिने बीए पूर्ण केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लक्ष्मीला एक लहान भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. परिस्थितीमुळे या दोघांनाही शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पण लक्ष्मीने जिद्द सोडली नाही, यासाठी ती अहोरात्र मेहनत घेत होती. अर्धवट शिक्षण सोडणारा भाऊ गणेश यांनी तिला आर्थिक मदत केली. बीए झाल्यानंतर लक्ष्मीने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. या काळात तिने नातेवाईकांकडून उसनवार पैसे घेतले. मोठे वडील आणि मामा यांनी लक्ष्मीला प्रोत्साहन आणि हिम्मत दिली. आज तिने मिळविलेल्या यशाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.