LAXMAN HAKE Y-PLUS SECURITY ROW saam tv
महाराष्ट्र

... अन्यथा कोर्टात जाणार; मराठा क्रांती मोर्चाचा 15 दिवसांचा अल्टिमेटम, कारण काय?

Laxman Hake Security Row: लक्ष्मण हाके यांना दिलेली वाय प्लस सुरक्षा तात्काळ काढण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी केली आहे. 15 दिवसांत सुरक्षा न काढल्यास उच्च न्यायालयात जाण्यासह राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Omkar Sonawane

भरत नागणे, साम टीव्ही

पंढरपूर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्र सरकारने दिलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा तात्काळ काढून घ्यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी केली आहे. 15 दिवसांच्या आत सुरक्षा न काढल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा ही डोंगरे यांनी दिला आहे. डोंगरे यांच्या मागणी नंतर पुन्हा मराठा - ओबीसी वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. लक्ष्मण हाके यांना 273 मते पडली असताना, कोणते मोठे समाजकार्य किंवा योगदान नसताना वाय प्लस सुरक्षा का दिली? चार SPO, पुढे-मागे पोलीस गाड्या असं संरक्षण दिलं जात आहे.

हाके हे OBC-मराठा वाद लावून जाती-जातीत भांडण लावण्याचे आणि दंगल घडवण्याचे काम करतात असा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की या सुरक्षा व्यवस्थेचा फेरविचार करावा. महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजातील युवकांनी आणि अठरा पगड जातीतील लोकांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला, SP ऑफिसला जाऊन निवेदन द्यावे आणि पोलीस संरक्षण मागावे. सर्वात जास्त टॅक्स भरणारा मराठा समाज आहे.

जर 15 दिवसात लक्ष्मण हाके यांचे पोलीस प्रोटेक्शन काढले नाही तर आम्ही कोर्टात जाणार आहोत, मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत आणि पोलीस महासंचालक कार्यालयासमोर मोठं आंदोलन करणार आहोत. ही सुरक्षा काढली तर महाराष्ट्रात वातावरण शांत होईल, असे ही डोंगरे यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लक्ष्मण हाकेंना दिलेली Y प्लस सुरक्षा तात्काळ काढा; मराठा क्रांती मोर्चाचा 15 दिवसांचा अल्टिमेटम

अमित शहा मुंबई दौऱ्यावर असतानाच केजरीवालांनी खेळला मोठा गेम; नव्या युतीनं वाढवली भाजपसह काँग्रेसची डोकेदुखी

Soak Badam Benefits: सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खा; शरीराला मिळतील ‘हे’ ७ आरोग्यदायी फायदे

Konkan Temples : कोकणात लपली आहेत गणपतीची ५ प्रसिद्ध मंदिरे, पाऊल ठेवताच मन होईल प्रसन्न

काँग्रेसवर कोसळला दु:खाचा डोंगर; ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT