महाराष्ट्र

Laxman Hake : जरांगे पाटील नावाचं लूत भरलेलं घोडं आम्ही वेशीत अडवलं; लक्ष्मण हाके यांची टीका

Bharat Jadhav

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ९ व्या दिवशी आंदोलन स्थगित केलं. आंदोलन स्थगित करताच जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने यांनी टीका केलीय. ज्या आंदोलनाला सुरुवात झाली, ज्या बेकायदा मागण्याला सुरुवात झाली. त्याच वेशीत जरांगे पाटील नावाचं लूत भरलेलं घोडं आम्ही वेशीत अडवलं अशी टीका हाके यांनी केली. तर तुतारीची सुपारी घेतलेल्या जरांगेला पटवण्यामध्ये सरकार अपयशी झालंय, असं ससाने म्हणाले.

विनोद जिरे, साम प्रतिनिधी

सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले होते. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस होता. त्यांची प्रकृती खालावत चालली होती. डॉक्टर आणि मराठा बांधवांच्या विनंतीनंतर मध्यरात्री जरांगे पाटील यांनी उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी आज उपोषण स्थगित केले. त्यानंतर आता ओबीसी आंदोलनकर्ते यांनीही त्यांचे आंदोलन थांबवले आहे. उपोषण थांबवण्यापूर्वी लक्ष्मण हाके यांनी जरांगेवर जोरदार टीका केलीय.

आम्ही महाराष्ट्र शासनाला रोखले. जिथून ज्या आंदोलनाला सुरुवात झाली, ज्या बेकायदा मागण्याला सुरुवात झाली, त्याच वेशीत जरांगे पाटील नावाचं लूत भरलेलं घोडं आम्ही वेशीत अडवलं.वेशीत असं तसं नाही, ते जागेवर थांबवले, ते उलट करायचं? की पालट करायचं? का माघारी घालवायचं ? की अरबी समुद्रात घालायचं ? यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत.

पुढे बोलतांना हाके म्हणाले, मला एक आनंद आहे, ज्या वेशीमधून, ज्या गावामधून बेकायदा मागण्या, ओबीसी आरक्षणमधून आम्हाला आरक्षण पाहिजे, असा हट्ट करणं, ओबीसींना टार्गेट करणे, हे सगळे मनसुबे या जरांगे नावाच्या माणसाची उधळून लावले आहेत, त्यामुळे या आमच्या आंदोलनाला यश आले आहे.

जरांगेंना टोला

जरांगे ना सदिच्छा आणि शुभेच्छा आहे. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, त्यांना एखादा पुरस्कार भेटावा. भारतरत्न पुरस्कार मिळतो का, पहावं? साधे सरपंच झाले होते, त्यांच्या जातीचे, त्यामुळे आम्ही जरांगेना एका पुरस्काराची शिफारस करू आणि त्याच पुरस्कारावर बसून मिरवणूक काढावी.

हाके यांचे जरांगेंना प्रश्न

माधव पॅटर्न १९८० पूर्वीचा होता. जरांगे १९४७ नंतर मराठा व मराठा इत्तर चळवळ कोणी उभा केली? ब्राह्मणांची भीती घालून आम्हा बहुजनांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचे काम कोणी केलं? हे आम्हाला सांगायला लावू नका, त्यात मेलेली मढी उकरून काढावी लागतील. जुन्या नेत्यांची सगळे धोरण काढावे लागतील, त्यांचे चेले यशवंतरावांचे मानसपुत्र मानणारे लोक कसे वागले हे सांगावे लागेल, असं हाके म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: कोल्हापुरात भाजपची ताकद वाढली, अमित शहा यांच्या उपस्थितीत बड्या नेत्याने केला BJP मध्ये प्रवेश

Marathi News Live Updates: नवी मुंबई परतीच्या पावसाचा धुमाकूळ,

Larvae in Cadbury: कॅडबरीत आढळल्या अळ्या! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने काय केला खुलासा, वाचा...

Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का? बडे नेते तुतारी फुंकणार? VIDEO

Weather Update: चक्रीवादळाचा कहर! मुंबईनंतर 'या' राज्यांमध्ये करणार विध्वंस, पाहा IMD चा नवी अपडेट

SCROLL FOR NEXT