Laxman Hake on Maratha Aarakshan Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा समाज मागास असेल तर त्यांच्या पुढे कोण गेलंय? लक्ष्मण हाके यांचा तिखट सवाल

Laxman Hake on Maratha Aarakshan : ओबीसी आरक्षण फक्त मागासवर्गीयांसाठीच आहे. मराठा समाज मागासलेला नाही, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

Satish Daud

राज्य सरकारने सगेसोयरेचा अध्यादेश काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला आहे. मात्र, जरांगे यांच्या मागणीला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी विरोध केलाय. ओबीसी आरक्षण फक्त मागासवर्गीयांसाठीच आहे. मराठा समाज मागासलेला नाही, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

जालना येथे पत्रकारांसोबत संवाद साधताना लक्ष्मण हाके म्हणाले, "मी गेली अनेक दिवस सांगतोय की बेरोजगारांना आपली उन्नती तसेच प्रगती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत. ओबीसी आरक्षण हे फक्त मागासवर्गीयांसाठी आहे. मराठा समाज मागासलेला असेल तर मग त्यांच्या पुढे नेमकं कोण गेलंय हे मला सांगावं", असा तिखट सवाल हाके यांनी विचारला आहे.

"महाराष्ट्र शासनाने इंपिरिकल डेटा गोळा करावा. मराठा समाज जर मागास असेल तर त्यांच्या पुढे सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, बंजारा, माळी कुणीतरी पुढे गेलेला पाहिजे. कुणाकडे तरी मराठा समाजापेक्षा अधिक कारखाने पाहिजेत. त्यांच्यापेक्षा अधिक आमदार-खासदार इतर समाजाचे निवडून आलेले पाहिजेत", असंही हाके यांनी म्हटलंय.

पुढे बोलताना हाके म्हणाले, "नोकऱ्यांमध्ये क्लास वन, क्लास टू आणि क्लास थ्रीमध्ये कुणाचं प्रतिनिधीत्व आहे? माझ्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील शासन व्यवस्थेत सर्वाधिक प्रतिनिधीत्व मराठा समाजाकडेच आहे. मग एवढ्या प्रमाणात एखाद्या समाजाकडे प्रतिनिधीत्व असेल, तर तो समाज मागास कसा असेल?" असा सवाल देखील लक्ष्मण हाके यांनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT