Laxman Hake On Maratha Protest x
महाराष्ट्र

Laxman Hake : शासनाला GR काढायचा अधिकार नाही, उपाययोजना ओबीसी आरक्षण संपवणारी; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Laxman Hake Reaction : मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारने हैदराबाद गॅझेटसंबंधित जीआर काढला. या एकूण परिस्थितीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

  • मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यावर हैदराबाद गॅझेटचा जीआर काढला गेला.

  • ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

  • या जीआरचा ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Laxman Hake On Maratha Protest : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुंबईत आंदोलन केले होते. त्यांच्या मागण्यांपैकी काही मागण्या मान्य करण्यात आल्या. मागण्यांपैकी हैदराबाद गॅझेटची मागणी तात्काळ मान्य करण्यात आली. मराठा उपसमितीशी चर्चा केल्यानंतर काही तासांच्या आत हैदराबाद गॅझेटचा जीआर मनोज जरांगे यांनी मान्य केला.

हैदराबाद गॅझेटचा जीआर मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर मनोज जरांगे हे मुंबईहून छत्रपती संभाजीनगरसाठी निघाले. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर, हैदराबाद गॅझेटचा जीआर काढल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारच्या निर्णयावर नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हैदराबाद गॅझेटच्या भाषेमध्ये काहीच फरक नाहीये. जी उपाययोजना केली आहे, ती राज्यातील ओबीसी आरक्षण संपवणारी आहे. राज्यात बोगस प्रमाणपत्र दिली जात आहेत. अगदी २५ हजार पासून ते लाख रुपयांपर्यंत याची किंमत आहे. हा जीआर काढायचा अधिकार सरकारला नाही. यामुळे ओबीसीचे आरक्षण संपुष्टात येणार आहे, असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केले आहे.

जीआर काढण्याचा राज्य सरकारला अधिकार नाहीये. मराठा उपसमिती एकतर्फी निर्णय घेतला आहे. सरकारला झुंड कळत असेल, तर झुंड घेऊन जावं लागेल. पुढे जाऊन रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. येत्या निवडणुकीमध्ये बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट होईल, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT