Shantabai Kopargaonkar Saam TV
महाराष्ट्र

Shantabai Kopargaonkar : कशी नशिबानं थट्टा आज मांडली... आपल्या अदा, नृत्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या लावणी सम्राज्ञीवर भीक मागण्याची वेळ

Ahmedngar News : शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर असं या लावणी सम्राज्ञींचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Ahmednagar News : एकेकाळची लावणी सम्राज्ञी जिच्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोअर, टाळ्या आणि शिट्यांनी गाजलं. जिच्या अदाकारीने आणि सौंदर्यानं चाळीस वर्षांपूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केलं. ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी आता मात्र रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे. बस स्थानकच तिचं घर झालं असून अत्यंत बिकट अवस्थेत ती जगत आहे.

शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर असं या लावणी सम्राज्ञींचं नाव आहे. एकेकाळी याच शांताबाईंनी लावणी नृत्याने उत्तर महाराष्ट्र गाजवला. लालबाग परळचं हनुमान थिएटर गाजवलं. त्यांची कला, सौंदर्य आणि लोकप्रियता पाहून चाळीस वर्षांपूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तार भाई यांनी 'शांताबाई कोपरगावकर' हा तमाशा काढला.

तमाशा फडाच्या मालक बनल्या, पण..

शांताबाई मालक झाल्या आणि पन्नास-साठ लोकांचे पोट भरू लागल्या. यात्रे-जत्रेत तमाशा प्रसिद्ध झाला, बक्कळ पैसा मिळू लागला. मात्र अशिक्षित शांताबाईची फसवणूक झाली. अत्तार भाईंनी सर्व तमाशा विकून टाकला आणि शांताबाई उद्धवस्त झाल्या. त्यांना मानसिक आजाराने ग्रासलं. त्या उद्विग्न अवस्थेत भीक मागू लागल्या. पती नाही, ना कुणी जवळचं नातेवाईक. त्यामुळे कोपरगाव बसस्थानकच शांताबाईचं घर झालं. (Latest Entertainment News)

व्हायरल व्हिडीओनंतर शोध सुरु

शांताबाईचे वय आज ७५ वर्षे आहे. मात्र विस्कटलेले केस, फाटकी साडी, सोबत कपड्यांचे बाजके अशा अवस्थेतील शांताबाई बस स्थानकावर आजही "ओळख जुनी धरून मनी" ही लावणी गात बसलेल्या असतात. शांताबाईची लकब, अदाकारी, हातांची फिरकी आणि डोळ्यांची भिरकी बघून कुणीतरी त्यांचा व्हिडीओ बनवून सोशल माध्यमांवर टाकला.

खान्देश भागातील काही तमाशा कलावंतांनी हा व्हिडीओ बघितला आणि कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना पाठवला. खरात यांनी दोन दिवस शांताबाईचा शोध घेतला आणि अखेर ती कोपरगाव बसस्थानकात आढळून आली. अरुण खरात आणि त्यांचे मित्र डॉ. अशोक गावीत्रे हे त्यांना रुग्णालयात घेऊन गेले आणि शांताबाईंना वैद्यकीय मदत केली. (Ahmednagar News)

शासनाकडून मदतीचं आवाहन

शांताबाईंना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी असून हलाखीचे जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. राज्य सरकारने त्यांना वाढीव मानधनासह वैद्यकीय मदत आणि राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. अशोक गावीत्रे यांनी सांगितलं.

आज लावणीच्या नावाखाली वेडेवाकडे नाचणाऱ्या काही नृत्यांगणावर लाखो रुपये खर्च करण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. मात्र शांताबाईंसारखे अनेक लोककलावंत आहेत जे काळाच्या ओघात दुर्लक्षित झाल्याने हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने शासनासह समाजाने पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे.

Edit By - Pravin Wakchoure

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT