Asha Kale Jeevan Gaurav Award: ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Actress Asha Kale Jeevan Gaurav Award: आशा काळे यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे.
Lifetime Achievement Award declare to Veteran actress Asha Kale Award
Lifetime Achievement Award declare to Veteran actress Asha Kale Award Saam TV
Published On

Asha Kale Honoured With Lifetime Achievements Award : मराठी सिनेविश्वातील काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांचे नाव आजही प्रेक्षक खूप आपुलकीने घेतात. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री आशा काळे. अशा काळे यांनी अनेकवर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना २०२३ या वर्षासाठी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. आशा काळे यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे सर्व कलाकारांचे श्रद्धास्थान तसेच रसिकांचे आदराचे स्थान आहे. दरवर्षी या वास्तूचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. यंदाचा ५५ वा वर्धापन दिन सोहळा खास ठरणार आहे.

Lifetime Achievement Award declare to Veteran actress Asha Kale Award
HBD Raj Babbar : राज बब्बर यांच्या सिनेमापेक्षा त्याचं पर्सनल आयुष्य जास्त रंजक, जाणून घ्या काय घडलंय एवढं

२६ जून रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. त्याला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यानंतर पुढील तीन दिवस २८ जून पर्यत विविध कलात्मक कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांसाठी असणार आहे. (Latest Entertainment News)

त्यात प्रामुख्याने जादूचे प्रयोग, महाराष्ट्राची लोकधारा, चांडाळ चौकडीच्या करामती, प्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांची मुलाखत, मनिषा लताड प्रस्तूत हिटस् ऑफ लता मंगेशकर व आर. डी. बर्मन संगीत रजनी, पारंपारिक भारूड या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

याशिवाय महिलांसाठी मंगळागौर, फक्त महिलांसाठी लावणी महोत्सव, शाहीर दादा कोंडके यांच्या ढंगात 'दादांची आठवण आली का', द इन्स्ट्रुमेंटल आर.डी., तसेच चर्चासत्रात थेट भेट नाट्य-चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांच्याशी सौमित्र पोटे यांनी साधलेला संवाद आणि यावर्षी पहिल्यांदाच मास्टर जयसिंग पाचेगांवकर सह लता-लंका पाचेगांवकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे सादरीकरण होणार आहे.

Lifetime Achievement Award declare to Veteran actress Asha Kale Award
Suhana Khan Property : ॲक्टिंग सोडून शेतीकडे वळाली सुहाना खान ? अलिबागमध्ये खरेदी केली कोट्यवधींची शेतजमीन

त्याचबरोबर बालगंधर्व परिवाराची आनंदवारी-गंधर्वदारी हा भक्तीगीत व भावगीतांचा कार्यक्रम, बालनाटिका जिर्णोद्धार, प्रसिद्ध व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे सर यांचे 'शिवचरित्रातून काय शिकावे' या विषयावर व्याख्यान, महाराष्ट्रात गाजत असलेल्या लोकगीतांचा कार्यक्रम 'आवाज महाराष्ट्राचा' लोकप्रिय गायिका राधा खुडे आणि सहभागी कलाकार त्यानंतर पारंपारिक जागरण गोंधळाचा कार्यक्रम यावेळी पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com