Latur News  Saam Tv
महाराष्ट्र

Latur News: आई मला माफ कर..., २ मार्क्स कमी पडल्याने पोलिस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, तरुणानं आयुष्यच संपवलं

Latur Youth End Life: पोलिस भरतीचे स्वप्न अपूर्ण राहिल्यामुळे तरुणाने आत्महत्या केली. फक्त २ मार्क्स कमी मिळाल्यामुळे तरुणाला पोलिस होता आले नाही. या घटनेमुळे लातूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Priya More

संदीप भोसले, लातूर

लातूरमध्ये तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. २ मार्क्स कमी पडल्याने पोलिस भरती हुकली त्यामुळे नैराश्येत येऊन २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. 'आरक्षण असतं तर पोलिस भरतीत लागलो असतो, आई मला माफ कर...', अशी चिठ्ठी लिहित नागेश यादव या तरुणाने आपली जीवन यात्रा संपवली. या तरुणाच्या आत्महत्येमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.

अनेकदा प्रयत्न करूनही पोलिस भरतीचे स्वप्न अपूर्ण राहिलं. तर यावेळी वेटिंगमध्ये असूनही केवळ २ मार्कांनी पोलिस भरती हुकली याच वैफल्यातून लातूरमध्ये तरुणाने आत्महत्या केली. औसा तालुक्यातल्या बोरफळ इथे ही घटना घडली. नागेश यादव (२३ वर्षे) असं या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने शेतामध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. नागेशने 'आरक्षण असतं तर नोकरी लागली असती. आई मला माफ कर.', अशा आशयाची चिठ्ठी लिहित आत्महत्या केली.

नागेश यादव या तरुणाच्या घरची परिस्थिती खूपच हालाकिची होती. त्याच्या कुटुंबाकडे फक्त एक एकर शेती आहे. मुलाने पोलिस व्हावं यासाठी त्याच्या आईने खूप मेहनत घेतली आणि खर्चही केला. पाच ते सहा परीक्षांमध्ये एक ते दोन गुणांनी हुलकावणी दिली. यावेळी नागेश वेटिंगमध्ये होता पण दोन मार्क्सने त्याची यावेळी देखील भरती होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यामुळे नागेश नैराश्येत गेला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले.

नागेश आपल्या स्वतःच्या शेतात कोणालाही न सांगता गेला. त्याने शेतामधील एका झाडाला गळफास घेत जीवन यात्रा संपवली. नागेशच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. नागेशच्या संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुनेत्रा वाहिनी राष्ट्रीय अध्यक्ष होतील - अमोल मिटकरी

Pav Bhaji Khakhra: घरीच बनवा कुरकुरीत पावभाजी खाकरा; सोपी रेसिपी वाचा

Budget 2026: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे शिक्षण किती?

मुंबईला रवाना होण्यापूर्वी शरद पवारांची अजितदादांच्या अंत्यस्थळाला भेट अन् नजर टाकताच...;

Skin Care: महागडी पार्लर ट्रिटमेंट कशाला? घरच्या घरी तयार केलेला 'हा' फेसपॅक लावा, मिळेल हेल्दी ग्लॉईंग स्किन

SCROLL FOR NEXT