Latur News  Saam tv
महाराष्ट्र

Shocking : हृदयद्रावक! उष्माघाताने ९ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; लातूरमध्ये हळहळ

Latur News : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात तापमानाचा पारा वाढला. वाढत्या उष्माघाताने ९ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यात वाढत्या उकाड्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Alisha Khedekar

  • लातूरमध्ये उष्माघाताने ९ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

  • औसा तालुक्यातील गोंद्री गावातील हृदयद्रावक घटना

  • तापमान ४० अंशांपार; उष्णतेचा कहर वाढला

  • चार दिवसांत दुसरी उष्माघाताची घटना

  • नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला

एकीकडे अवकाळी पावसाने राज्यात हैदोस घातला, तर दुसरीकडे दिवसेंदिवस उकाडा वाढत चालला आहे. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असून या उष्मघाताने कित्येक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशातच लातूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. नुकतंच जगाची ओळख झालेल्या ९ महिन्यांच्या बाळाचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर बाळाच्या आईने हंबरडा फोडला असून कुटुंबियांवर दुःखद प्रसंग ओढवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना लातूरच्या औसा तालुक्यातील गोंद्री गावात घडली आहे. एका कुटुंबात ९ महिन्यांपूर्वी एका बाळाने जन्म घेतला आणि अख्ख घर आनंदी झालं. मात्र या कुटुंबाच्या आनंदावर काळाने घाला घातला. कारण ठरलं वाढतं तापमान. या उष्माघाताने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. या घटनेने मृत बाळाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला आहे. लातूरमध्ये दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या वेळेत ४० ते ४१ अंश सेल्सिअस वर तापमान गेले आहे. चार दिवसापूर्वी औराद शहाजनी येथे साठ वर्षे शेतकऱ्याचा उष्माघातानी मृत्यू झाला होता, तर आज औसा तालुक्यातल्या गोंद्री येथे नऊ महिन्याच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. सततच्या घडणाऱ्या या घटनांनी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

धुळ्यात ४२.८°c उचांकी तापमानाची नोंद

धुळ्यात तापमानाचा कहर बघावयाला मिळत आहे. आज धुळ्यामध्ये ४२.८°c उचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या तापमानाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसून येत असून, नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडण टाळत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावरती अक्षरशः शुकशुकाट दिसून येत आहे. धुळे शहरातील ज्या मुख्य रस्त्यांवर दिवसभर नागरिकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते, ते रस्ते अक्षरशः निरमनुष्य दिसू लागले असून, हवामान विभागातर्फे पुढील काही दिवस तापमानामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस तापमान

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर पाहायला मिळत आहे. जिल्ह्याचे तापमान आज चक्क ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने याचा परिणाम जनजीवनावर होताना पाहायला मिळत आहेत. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने १८ ठिकाणी उष्माघाती कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. वाढत्या तापमानामुळे रस्त्यांवर देखील शुकशुकाट पाहायला मिळत आहे, तर येणाऱ्या काही दिवसात ४३ अंश सेल्सिअसवर असलेलं तापमान चक्क ४५ अंश सेल्सिअस वर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर निघताना काळजी घेण्याचा आवाहन जिल्हा प्रशासनाचा वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळ्यात भारतीय संविधान सेनेचे ‘संविधान जागर आंदोलन’; उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी

Cancer Reasons: कोणतंही व्यसन नसताना कॅन्सर का होतो? जाणून घ्या यामागची ७ महत्त्वाची कारणं

Dombivli Tourism : डोंबिवलीजवळ फिरण्यासाठी 'ही' आहेत ५ सुंदर पर्यटन स्थळे, वीकेंडला पावसात येईल मजा

राहुल- प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात; काँग्रेस खासदारांचीही धरपकड

CJP च्या आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

SCROLL FOR NEXT