महाराष्ट्र

Latur Politics : डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर? लातूरमध्ये काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता

साम टिव्ही ब्युरो

संदीप भोसले | लातूर

Latur News :

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. एक एक करुन अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. आता काँग्रेसला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. डॉ अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई आहेत. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आता लातूमधून देखील डॉ.अर्चना पाटील चाकूकर या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. असं झाल्यास लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो.

काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा राजीनामा

मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश.

काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश.

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश.

गडचिरोलीतील काँग्रेसचे नेते, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांचा भाजपमध्ये प्रवेश.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पतीच्या त्रासाला कंटाळून पतीने संपविले जीवन; पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Watch: डाव्या की उजव्या कोणत्या हातावर घड्याळ घालणे ठरेल योग्य?

Mahanand Dairy : महाराष्ट्रातील महानंद डेअरी इतिहास जमा; गुजरातच्या मदर डेअरीने मिळवला ताबा, हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

Supriya Sule News: 'कोणाला काय मिळालं हिशोब करा, सगळं स्पष्ट होईल', सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर पलटवार

KL Rahul - Sanjiv Goenka: केएल राहुलच नव्हे, तर संजीव गोयंकांनी धोनीचाही केला होता अपमान; वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT