latur, ganeshotsav 2022, latur police saam tv
महाराष्ट्र

Ganpati Bappa Morya : पाेलिसांच्या रुपात 'बाप्पा' पावला; नव्वद ताेळे साेनं मिळालं परत

या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.

दीपक क्षीरसागर

Latur News : आज राज्यभरात गणेशाेत्सवाच्या (ganesh utsav) पार्श्वभुमीवर नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र आनंदी वातावरण असून लातूर शहरात तर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी (police) चाेरीस गेलेला तब्बल 45 लाख रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत केल्याने संबंधित कुटुंबांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावला. तसेच संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यानंतर चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. चोरीला गेलेला तब्बल 90 तोळे दाग दागिन्याचा मुद्देमाल संबधित तक्रारदारांना परत करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे एकूण 13 गुन्हे दाखल होते. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्याकरिता पथके तयार करण्यात आली होती.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली कायदेशीर बाबींची पूर्तता करून चोरीस गेलेले 45 लाख रुपयांचे 90 तोळे सोन्याचे दागिने संबधित नागरिकांना परत करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या उपस्थीत पोलीस ठाणे विवेकानंद येथे संबधित फिर्यादी मूळ मालक असलेल्या नागरीकांना मुद्देमाल परत देण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लोणावळ्यात भाजपच्या प्रचार सभेत चित्रा वाघ यांचे वक्तव्य चर्चेत

Vande Bharat News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या दोन स्थानकांवर वंदे भारतचा थांबा

Matar Kebab Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बनवा कुरकुरीत, मसालेदार व्हेज मटर कबाब

कल्याण अर्णव खैरे आत्महत्याप्रकरणी महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या तपासात मोठी माहिती उघड

Skin Care: चेहऱ्यावरील रिंकल्स कमी करुन सॉफ्ट आणि ग्लोईंग चेहरा पाहिजे असेल, तर तुमच्या खाण्यात 'या' गोष्टी करा ट्राय

SCROLL FOR NEXT