latur, mokka , crime news saam tv
महाराष्ट्र

Latur News : 'त्या' खून प्रकरणानंतर ११ जणांवर 'माेक्का' ची कारवाई

या सर्व गाेष्टी लक्षात घेता पाेलिस दलानं त्यांच्यावर माेक्काची कारवाई केली आहे.

दीपक क्षीरसागर

Latur : लातूर (Latur) जिल्ह्यातील अकरा गुन्हेगारांना माेक्का लागला आहे. लातूर जिल्ह्यात सुमारे बारा वर्षानंतर पुन्हा गुन्हेगारांवर माेक्का लागल्याने चुकीचं काम करणा-यांनी धसका घेतल्याची चर्चा आहे. या कारवाईमुळं आगामी काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्था अबाधित राहील असेही म्हटलं जात आहे.

चाकूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक (arrest) करण्यात आलेल्या टोळीतील 11 जणांविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तब्बल बारा वर्षानंतर लातूर पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कायदा व सुव्यवस्था यांचेकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. संघटित गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई ही लातूर जिल्ह्यातील जवळपास बारा वर्षानंतरची पहिलीच कारवाई आहे.

चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील चापोली शिवारात 20 मार्च 2022 रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते व पोलीस अंमलदार यांनी तपास करून गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी व सूत्रधार असलेला नारायण तुकाराम इरबतनवाड (45, रा. शिरूर ताजबंद, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर) यांच्यासह इतर 11 ज्यामध्ये 10 संशयित आरोपी आणि 1 विधी संघर्ष बालकांना पकडलं हाेते.

या सर्वांनी गुन्हा कबूल केला हाेता. त्यांच्याकडून गुन्ह्याबाबत सखोल तपास केला असता असे निदर्शनास आले की, या गुन्ह्यातील संशयित आरोपी टोळीगुन्हे करणारे तरबेज व सराईत धाडसी व कुख्यात व सक्रिय गुन्हेगार आहेत.

त्यांनी लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे गांधी चौक, पोलीस ठाणे अहमदपूर व चाकूर तसेच नांदेड जिल्ह्यातील पोलीस ठाणे मुखेड हद्दीत स्वतःच्या आर्थिक लाभासाठी, संघटितपणे, वेगवेगळे साथीदार घेऊन टोळी निर्माण करून हिंसाचाराचा वापर व कट करून जीवे मारणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्याराने दुखापत करणे असे प्रकार केले हाेते.

तसेच अवैधपणे अफूची तस्करी करणे यासारखे गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करून अवैध सावकारीच्या माध्यमातून स्वतःचे व टोळीतील साथीदाराचे आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करतात. याबराेबरच सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करून लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण करणे, स्वतःचा व सोबतच्या साथीदारांचा आर्थिक फायदा करण्यासाठी स्वतःला भाई, दादा सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. या सर्व गाेष्टी लक्षात घेता पाेलिस दलानं त्यांच्यावर माेक्काची कारवाई केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT