Latur News Yandex
महाराष्ट्र

Latur News: शुभमंगल सावधान! पोलीस ठाण्याच्या दारातच वाजली सनई, लातूर पोलिसांनी लावलं प्रेमीयुगुलाचं लग्न

Rohini Gudaghe

संदिप भोसले, साम टीव्ही लातूर

लातूरमध्ये पोलीस ठाण्याच्या दारातच सनई वाजली आहे. चक्क पोलिसांनीच प्रेमीयुगुलाचं लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. लातूर शहरातील रामगिरी नगर येथून पळून गेलेल्या तरूणीचं तिच्या प्रियकरासोबत लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्याच्या दारातच लग्न लावून देण्यात आलं आहे. या तरूणीचं वय २० तर तिच्या प्रियकराचं वय २२ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लातूर (Latur News) पोलिसांनी लावलेल्या या आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. कारण पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना पोलीस ठाण्यात बोलवत त्यांच्या संमतीने पोलीस ठाण्याच्या दारातच १४ मे रोजी या प्रेमीयुगुलाचं लग्न लावलं आहे. या अनोख्या लग्नाची शहरात मोठी चर्चा सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

लातूर शहरातील स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याअंतर्गत रामगिरीनगर आहे. स्नेहा लाला कांबळे नावाची तरूणी तिच्या प्रियकरासोबत (अनिकेत निवृत्ती मस्के) पळून गेली होती. त्यानंतर (Marriage Of Lovers) तिच्या वडिलांनी ३० एप्रिल रोजी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी पोलीस या तरूणीचा शोध घेत होते. त्यानंतर तपास करत पोलीस हेड कॉन्स्टेबल आरडी जाधव यांनी या तरूणीस ताब्यात घेतलं.

त्यावेळी ती तिला आवडणाऱ्या तरूणासोबत असल्याचं त्यांना आढळलं. या दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याची ईच्छा व्यक्त केली. यानंतर पोलिसांनी या तरूणीच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांनी तिच्या आईवडिलांना समक्ष (Marriage In Police Station) लग्नाची विचारपूस केली. यावेळी मुलीच्या घरच्यांनी लग्नाला संमती दर्शविली. मात्र, त्यांनी हे लग्न पोलीस ठाण्यात पोलिसांसमक्ष पार पडावं असा आग्रह धरला. मुलगी आणि मुलाच्या मामाच्या विनंतीवरून हा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पोलीस ठाण्याच्या दारातच पार पडला.

यावेळी मुलीच्या मामाने मनी मंगळसूत्र, जोडवे, पैंजण, नविन कपडे, साडी फुलांचे हार (Love Marriage) आणले होते. मुलगा आणि मुलगी यांच्यासोबत उपस्थित नातेवाईकांच्या साक्षीने हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल जिआर यादव, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मुलाचे मामा, मुलीचे मामा यांची प्रमुख उपस्थिती होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT