Amit Deshmukh On Sambhaji Patil Nilangekar Saam Tv
महाराष्ट्र

Latur Political News: 'लातूरचा नवरदेव मुंबईत ठरतो, निलंग्याचा नवरदेव दिल्लीत ठरतो', अमित देशमुखांची भाजप आमदारावर मिश्किल टीका

साम टिव्ही ब्युरो

Amit Deshmukh On Sambhaji Patil Nilangekar: ''लातूरचा नवरदेव मुंबईत ठरतो. तर दुसरीकडे निलंग्याचा नवरदेव दिल्लीत ठरतो,'' अशा शेलक्या शब्दात काँग्रेस नेते आणि आमदार अमित देशमुख यांनी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना चिमटा कडलाय. लातूर येथील निलंगा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

यावे बोलताना ते म्हणाले आहेत की, ''येत्या काळात दिल्ली जो नवरदेव देईल, त्याचा बँड वाजवायला मी निलंग्यात येईल.'' त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यात मोठी राजकीय चर्चा होते आहे.

याआधी उदगीरमध्ये झालेल्या शेतकरी व्यापारी, हमाल, मापारी स्नेह व ऋण निर्देश मेळाव्यात बोलताना अमित देशमुख यांनी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली आहे. ते म्हणाले हेत की, ''निवडणुकीनंतर ज्या क्षणाला नेते मतदारांना गृहीत धरण्यास सुरुवात करतात, त्यावेळी नेत्यांच्या मनात बंडखोरीचे विचार येतात. तेव्हाच नेते राजकीय विचारांना सोडचिठ्ठी देतात. लोकशाहीत मतदारांशी इमान राखणे हे नेत्यांचे कर्तव्य आहे.'' Latest marathi News)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच आमचे दैवत, असे सांगत संजय बनसोडे यांनी २०१९ची विधानसभेची निवडणूक लढवली होती. हाच धागा धरत देशमुख म्हणाले, 'उदगीरहून मुंबईकडे जाताना एका नेत्याचा झेंडा आणि मुंबईहून उदगीरकडे येताना दुसऱ्या नेत्याचा झेंडा.'

महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून झालेल्या राजकीय घडामोडीचा संदर्भ देत, हे का घडले, कोणामुळे घडले, कसे घडले, हे सामान्यांना कळण्यापलीकडचे आहे, असं देशमुख म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT