Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला घातला दारूच्या बाटल्याचा हार; दारूविक्री विरोधात महिला आक्रमक

Latur : लातूरच्या महाराणा प्रताप नगर परिसरात दारू विक्रीच्या गोरखधंद्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. गावातील अनेकांना दारूचे व्यसन लागले आहे. तरुण देखील दारू पिट नशा करत असतात

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : गावात अवैधरित्या दारू विक्री सुरु असल्याने दारूबंदीची मागणी केली जात होती. मात्र प्रशासनांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गावातील महिला आक्रमक झाल्या होत्या. संतप्त महिलांनी आज ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन निषेध केला. तसेच दारूच्या बाटल्यांचा हार ग्रामपंचायत कार्यालयाला घालत आंदोलन करत गावात दारूबंदी करण्याची मागणी केल्यात आली. 

लातूरच्या महाराणा प्रताप नगर परिसरात दारू विक्रीच्या गोरखधंद्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. गावातील अनेकांना दारूचे व्यसन लागले आहे. तरुण देखील दारू पिट नशा करत असतात. या विरोधात गावातील महिलांनी प्रशासनाकडे अनेकदा गावात दारूबंदी करण्याची मागणी केली होती. तसेच देशी दारू दुकानास बेकायदेशीर रित्या दिलेली परवानगी तत्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती. 

प्रशासनाचे दुर्लक्ष 

गावात देशी दारू दुकानास बेकायदेशीर रित्या दिलेली परवानगी तत्काळ रद्द करण्यात अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष केले. महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील देशी दारू दुकानास बेकायदेशीर रित्या दिलेली परवानगी तत्काळ रद्द करण्यात यावी; अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तर मागणीची दाखल नाही घेतल्याच्या पुढील काळात तीव्र जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे.

गेटला बांधले बाटल्यांचे तोरण 

दरम्यान अशा अवैध्य फोफावत चाललेल्या दारू विक्रीवर तात्काळ कारवाई करावी; या मागणीसाठी महिलांनी महाराणा प्रताप नगरच्या ग्रामपंचायत कार्यालयाला रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा हार घालत निवेदन दिल आहे. तर तात्काळ दारूची व्यवसाय बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील या महिलांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO EDLI Scheme: तुमचं PF अकाउंट आहे? तुम्हाला मिळतो ७ लाखांचा मोफत विमा; कसं? वाचा सविस्तर

मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस, हजर होण्याचे आदेश, नेमकं कारण काय? VIDEO

Onkar Elephant : नदीत अंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर अमानुष हल्ला, अंगावर सुतळी बॉम्ब फेकले अन्...

Actress Journey: योगा टीचरवर पडली डायरेक्टरची नजर, केलं फिल्ममध्ये कास्ट; आज आहे कोट्यवधीची मालकीण

मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

SCROLL FOR NEXT