Latur Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Latur Water Scarcity : लातूर जिल्ह्यातील ८ पैकी ४ मध्यम प्रकल्प कोरडे; शेती सिंचनासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Latur News : मागील वर्षी पावसाळा कमी झाल्याने सर्वत्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. राज्यातील अनेक भागातील तलाव, धरणातील पाणी साठा आता कमी होत आहे.

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : यंदा दुष्काळाचे चित्र अधिक गडद होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात लातूर जिल्ह्यात पाण्याची समस्या अधिक बिकट होत चालली असून जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांपैकी चार मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. यामुळे आता आगामी काळात पाण्याची समस्या अधिक तीव्र होणार आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. 

मागील वर्षी पावसाळा कमी झाल्याने सर्वत्र पाणी टंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत आहे. राज्यातील अनेक भागातील तलाव, धरणातील पाणी साठा आता कमी होत आहे. यामुळे पाणी टंचाई अधिक गडद झाली आहे. यात (Latur) लातूर जिल्ह्यात हे चित्र अधिक तीव्र झालेले पाहण्यास मिळत आहे. तर लातूर जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख मांजरा नदीचे पात्र देखील कोरडे ठाक पडले आहे. परिणामी जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. 

शेती, सिंचनाचा प्रश्न 

लातूर जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्प आता कोरडे पडले असल्याने जिल्ह्यातील रेणा, व्हटी, तिरू, मसलगा या धरणांमध्ये आता ० टक्के पाणी साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असणाऱ्या गावांना अधिक तीव्र पाणीटंचाई जाणू लागली आहे. धरणातील पाणी कमी झाल्याने आता शेती व सिंचनाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Uttapam: नाश्त्याला झटपट बनवा उत्तप्पा; सर्वच आवडीने खातील

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबलचक रांगा | VIDEO

Serial TRP: 'ठरलं तर मग' की 'थोड तुझ थोड माझं'; टीआरपीच्या शर्यतीत कोणी मारली बाजी?

अंतराळात अन्न पचण्यासाठी किती तासांचा कालावधी लागतो?

Naigaon News : वसईमध्ये भयंकर घटना, १० हजार किलो काचेचा ढिग अंगावर कोसळला; २ कामगारांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT