पराग ढोबळे
नागपूर : नागपूरच्या पारडी आणि नंदनवन पोलिस ठाणे हद्दीत तीन वेगवेगळ्या घरफोड्या झाल्या होत्या. या घरफोडीतील चोरटे गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या टीमने उघडकीस आणले आहेत. यात आदित्य उर्फ गब्बर व विकास बब्बर आणि अन्य दोन अश्या चौघांना ताब्यात घेतळे. त्यांनी घरफोडीची कबुली दिली असून त्यांच्याकडून ३ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नागपूर (Nagpur) शहरातील पारडीच्या शिवमन नगरातील निवासी रितिक पटले यांच्याकडे घरफोडी झाली होती. याच तपासा दरम्यान पोलिसांनी मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहीद आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत चोरीची घटना उघडकीस आणली. तर नंदनवन पोलिस (Police) ठाण्याच्या हद्दीत मिरे ले आऊट मधील ऑटोमोबाईल दुकान फोडून साहित्य लंपास केला होता. या घटनेत शेख सोहेल उर्फ बिदू रोख फारुख आणि सोहेल कसाई ईकबाल कुरेशी याला अटक केलीय.
शहरातील अनेक भागांमध्ये दिवसभर फिरून बंद घरांवर हे पाळत ठेवत. त्यानंतर रात्रीच्या सुमारास संधी शोधून घरात चोरी करत. पोलिसांकडून सातत्याने होत असलेल्या घरफोडीच्या तपासा दरम्यान मुखबिरांच्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या घटनेतील चोरट्याना जेरबंद करण्यात यश मिळवले. गुन्हे शाखेच्या युनिट तिनच्या पथकाने (Nagpur Police) कारवाई करत ३ लाख ७८ हजाराच्या मुद्देमाल जप्त केला. यात एकूण चार रेकॉर्डवरील आरोपींना अटक केली. तसेच तीन विधी संघर्ष बालकांना सुधारगृहात पाठवण्यात आले. तर यातील आणखी एका आरोपींचा शोध सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.