Latur News : लातूर जिल्ह्यातील उदगीर जवळील बनशेळकी तलावात आईसह दोन मुले बुडाल्याची घटना घडली असून याची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मनीषा गौतम शिरसाठ या महिलेचा मृतदेह तालावबाहेर काढला आहे. पण अद्यापही दोन मुलांचा शोध सुरू आहे. (Latest Marathi News)
उदगीर (Udgir) जवळील बनशेळकी तलावाच्या काठावर एका महिलेची चप्पल, आधारकार्ड, पुरुषांचे बूट, तिच्या नऊ वर्षे वयाच्या मुलांसह तीन वर्षीय मुलींचे आधार कार्ड आढळले. या आधारे उर्वरित दोघांच्या शोधासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांच्या मदतीने तीन तास रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले.
परंतू दोन मुलांचा शोध अद्याप लागलेला नाही. पोलिसांनी नातेवाईकांकडे चौकशी केली असता मनीषाच्या पतीचे निधन झाल्याने ती मानसिकता ठीक नसल्यासारखी वागत होती. आधार कार्ड काढण्याचे कारण सांगून ती मुलांना घेऊन घराबाहेर पडली आणि आपल्या दोन्ही मुलांसह तलावात उडी घातली. (Latur News)
या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. महिलेचा मृतदेह सापडला असून दोन मुलांच्या मृतदेहाचा शोध अद्याप लागला नसल्याची माहिती बिट जमादार शिवप्रताप रंगवाळ यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.