Latur News
Latur News Saam TV
महाराष्ट्र

Latur News: दारू बंदीसाठी विद्यार्थी रस्त्यावर; मागणी पूर्ण न केल्यास रास्ता रोकोचा इशारा

साम टिव्ही ब्युरो

Latur News: गावागावात दारूबंदी (Liquor Ban) साठी अनेक महिला रस्त्यावर उतरतात. आंदोलने करतात अशात आता लातूरमध्ये चक्क शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी दारू बंदीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. या शाळकरी मुलांनी लातूरच्या रस्त्यांवर भव्य रॅली काढत दारू बंदीसाठी घोषणा दिल्या आहेत. (Latest Marathi News)

अनेक गावांमध्ये अनधिकृतपणे दारू विक्री केली जाते. अशात दावणगावात देखील अनधिकृतरीत्या दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दावणगावं येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि संत सावंता माळी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी (Students) गावातून दारूबंदीची भव्य रॅली काढली आहे. या रॅलीमध्ये गावातील अनेक महिला, युवक, तसेच शाळेतील शिक्षक वर्ग देखील सहभागी झाला होता.

गावात दारूमुळे आजवर अनेकांच्या घरांमध्ये कलह निर्माण झाले आहेत. तसेच काही संसार उध्वस्त झाले आहेत. आपल्या गावात, घरात सुरू असलेला गोधंळ आणि दारिद्र्य हे फक्त दारू मुळेच आहे. असे लक्षात येता शाळकरी मुलांनी दारू बंदीसाठी रॅली कढण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांनी गावातील दारू बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंढे आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.

या निवेदनात विद्यार्थ्यांनी दारू बंदीसाठी ५ डिसेंबर २०२२ पर्यंतची मुदत दिली आहे. या तारखेपर्यंत गावातील सर्वच अनधिकृत दारू विक्री बंद व्हायला हवी अन्यथा विद्यार्थींनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. दावणगावं येथील शिवाजी चौक येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची ही कामगिरी पाहून संपूर्ण गाव त्यांच्याबरोबर रास्ता रोकोमध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

SCROLL FOR NEXT