Aurangabad news
Aurangabad news saam tv

Aurangabad : तळीरामांनी ७ महिन्यात रिचवली विक्रमी विदेशी दारू; महसुलात ५० टक्क्यांनी वाढ

औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात गेल्या सात महिन्यात विक्रमी मद्य विक्री झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नवनीत तापडिया

Aurangabad News : औरंगाबादच्या तळीरामांनी विक्रमी विदेशी दारू विक्रम केला आहे. औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात गेल्या सात महिन्यात विक्रमी मद्य विक्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गेल्या सात महिन्यात औरंगाबादकरांनी तब्बल 1 कोटी 75 लाख 99 हजार 100 लिटर दारू रिचवली आहे. यामुळे मागील सात महिन्यात मद्य विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Latest Marathi News)

Aurangabad news
Ambadas Danve: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; अंबादास दानवे यांचा आरोप

औरंगाबाद (Aurangabad) शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर धाबे आणि हॉटेल्स वाढले आहेत. ज्यात अधिकृत मद्य विक्रीचा परवाना असलेल्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अवैध दारूविक्रीला लगाम पाहायला लागल्याचे मिळत आहे. तर दुसरीकडे मद्य विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या सात महिन्यात शासनाला मद्य विक्रीतून तब्बल 2,784 कोटी 89 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने ठरवून दिलेलं टार्गेट औरंगाबाद उत्पादन शुल्क विभागाकडून पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल पडत असल्याचे दिसत आहे.

औरंगाबादसह मराठवाडा (Marathwada) विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गेल्या काही महिन्यांपासून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या धाबे चालक आणि हॉटेल विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे हजारो रुपयांचा दंड मिळत असल्याने अनेक हॉटेल चालक आणि धाबे चालकांनी कानाला हात लावत अवैधरीत्या दारू विक्री बंद केली आहे.

Aurangabad news
Jalgaon: भाजप आमदार चव्हाण यांच्‍या विरोधातील हरकत फेटाळली; खडसे जाणार न्‍यायालयात

1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर पर्यंत झालेली मद्यविक्री -

देशी दारु - 93,87,705 लीटर

विदेशी दारु - 40,95,018 लीटर

बिअर - 40,20,322 लीटर

वाईन - 96,055 लीटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com