Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

Jalgaon: भाजप आमदार चव्हाण यांच्‍या विरोधातील हरकत फेटाळली; खडसे जाणार न्‍यायालयात

भाजप आमदार चव्हाण यांच्‍या विरोधातील हरकत फेटाळली; खडसे जाणार न्‍यायालयात
Published on

जळगाव : जिल्हा दूध संघासाठी अर्ज दाखल झाले आहे. यात मुक्ताईनगरातील (Muktainagar) जागेसाठी मंदाकिनी खडसे यांनी मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या उमेदवारीवर हरकत घेतली होती. मात्र, सदर हरकत फेटाळण्यात आल्यामुळे खडसे यांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. (Tajya Batmya)

Jalgaon News
नात्‍याला काळीमा; चुलत आजोबाकडून गतीमंद मुलीवर बलात्कार

जिल्‍हा दूध (Jalgaon) संघासाठीच्या २० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यात छाननीअंती एकूण ६५ उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे सद्यस्थितीत ११४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. छाननीप्रक्रियेत १७ जणांनी हरकती घेतल्या होत्या.

जिल्हा दूध संघासाठी दाखल उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडीसाठी रावेरची जागा बिनविरोध होण्याच्या स्थितीत होती. मात्र छाननीत बाद झालेल्या न्यायालयात उमेदवारांनी धाव घेतल्याने अधिकृतरित्या ही जागा बिनविरोध होऊ शकलेली नाही. दरम्यान, सोमवारपासून माघारीला सुरुवात झाली असून २८ नोव्हेंबरपर्यंत माघारीची शेवटची मुदत आहे. त्यानंतरच दूध संघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com