रुपाली बडवे, प्रतिनिधी
संपूर्ण देश साखरझोपेत असताना एका भयानक घटनेने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला. ही घटना आहे ३० वर्षापूर्वीची किल्लारी भूकंपाची. शरद पवारांनी सांगितला किल्लारीच्या विनाशकारी भूकंपाचा थरार! ३० सप्टेंबर १९९३ मध्ये लातुर किल्लारीमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाला आज ३० वर्ष पुर्ण झाली.
या घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मोठ्या हिमतीने पुनर्वसनाचे कार्य केले. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किल्लारी गावात शरद पवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी या भयंकर भूकंपाच्या कटू आठवणी सांगितल्या...
शरद पवारांचे संपूर्ण भाषण...
"आजचा दिवसा हा अस्वस्थ करणारा दिवस आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यांना विश्रांती घ्यायला वेळ नसतो. त्यात गणेशोत्सव होता. गणेशोत्सव काळात शेवटची मिरवणूक होईपर्यंत माहिती घ्यावी लागते. शेवटची परभणीचे मिरवणूक झाल्यानंतर मी झोपायला गेलो. पलंगावर अंग टाकताच काही मिनिटांत घराच्या खिडक्या हलल्या,"
काय म्हणाले शरद पवार...
हा भूकंप आहे लक्षात येताच आधी साताऱ्याला फोन केला. कोयना धरणात भूकंप केंद्राला माहिती विचारली. त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीमध्ये भूकंप झाल्याचं सांगितलं. मी लगेच सगळया अधिकाऱ्यांना उठवलं, आणि सकाळी सहा वाजता लातुरकडे निघण्यासाठी विमानाची सोय करण्याच्या सूचना दिल्या.
अस संकट कोणावर येवू नये...
किल्लारीत जाताना पाहिलं. घरे पडलेली, प्रेत पडलेली. आयुष्यात अस संकट येवू नये. माहिती घेतल्यानंतर लक्षात आल, फक्त किल्लारीच नव्हेतर आजूबाजुच्या जिल्ह्यांनाही याचा धक्का बसला होता. यातून बाहेर पडायचं असेल तर सबंध राज्याची, देशाची शक्ती या ठिकाणी लावली पाहिजे, हे लक्षात आलं.
त्याचदिवशी २ तासात आजूबाजूच्या जिल्हाधिकाऱ्यांना, डॉक्टरांना बोलावले. मदत कशी करता येईल याबाबत चर्चा केली आणि पुनर्वसनाला सुरूवात केली. त्याकाळात मी संपूर्ण कारभार सोलापूरमधून केला. सकाळी उठून रात्री २, ३ पर्यंत २ जिल्ह्यांचे दौरे करायचो, असे पवार (Sharad Pawar) यावेळी म्हणाले.
अन् बैलगाडीत झोपलेला जिल्हाधिकारी दिसला....
यासंकटात लोकांनी, प्रशासनाने झपाटून काम केल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. आपल्या भाषणात बोलताना शरद पवार यांनी एक खास किस्साही सांगितला. एकदा रात्री फिरत असताना एका बैलगाडीत एक व्यक्ती झोपलेली मला दिसली. घर नसल्याने बाहेर कोणी झोपले आहे का यासाठी विचारणा केली.
मी त्यांना उठवून विचारले तेव्हा लक्षात आलं की, ते जिल्हाधिकारी प्रविणसिंह परदेशी होते. दिवसभर काम करुन रात्रीची विश्रांती हे जिल्हाधिकारी घेत होते, असे सांगत या संकटात अनेकांनी धैर्याने लढा दिल्याचे शरद पवार म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.