Marathi Board: रायगडमध्ये इंग्रजी भाषेतील पाट्यांवर फासलं काळं; मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक

MNS News: दोन महिन्यांची मुदत संपण्याआधी सर्व दुकानदारांनी मराठीत पाट्या लावणे गरजेचे आहे.
Marathi Board
Marathi BoardSaam TV
Published On

सचिन कदम

Raigad News:

मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झालेत. रायगडच्या माणगावमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी इंग्रजी भाषेतील पाट्यांवर काळं फासलं असून इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावण्यास दुकानदारांकडे आग्रह केला आहे. (Latest Marathi News)

Marathi Board
TRP Rating Of Marathi Serial: ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती, TRP मध्ये नंबर १ वर; तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’लाही टाकलं मागे

मनसे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, संपर्क अध्यक्ष चिमण सुखदरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर मराठी पाट्यांसाठी मनसे सक्रिय झाले आहे. चार दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिलेत.

सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात सर्व दुकानदारांना मराठीत पाट्या लावण्यासाठी २ महिन्यांची मुदत दिली आहे. दोन महिन्यांची मुदत संपण्याआधी सर्व दुकानदारांनी मराठीत पाट्या लावणे गरजेचे आहे.

राज्यात सध्या मुंबईतील मुलुंडमध्ये घर नाकारल्याची घटना चर्चेत आहे. तृप्ती देवरुखकर आपल्या पतीसह मुलुंड पश्चिममध्ये ऑफिससाठी भाड्याने जागा पाहण्यासाठी आल्या होत्या. मात्र तुम्ही मराठी असल्याने तुम्हाला ऑफिस मिळणार नाही असं तेथील व्यक्तींनी त्यांना सांगितलं.

हा सर्व प्रकार तृप्ती यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर मनसेने संबंधित व्यक्तींना आपल्या स्टाइलने उत्तर दिले. तसेच आता दुकानावरील पाट्यांबाबात देखील मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

Marathi Board
MNS News: 'मराठी माणसांना जेरीस आणून राजधानी हिसकावली जातेय, पण..; मुलूंड प्रकरणानंतर राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून फटकारे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com