Politics : महसूल विभागात 'वाझे' कोण? याचा शोध घेण्याची गरज : निलंगेकर
Politics : महसूल विभागात 'वाझे' कोण? याचा शोध घेण्याची गरज : निलंगेकर  SaamTvNews
महाराष्ट्र

Politics : महसूल विभागात 'वाझे' कोण? याचा शोध घेण्याची गरज : निलंगेकर

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : 12 जुलै 2021 रोजी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातून एक जाचक परिपत्रक काढण्यात आले. या परिपत्रकामुळे महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यामध्ये मोठा परिणाम झाला. यावर जिल्ह्यात आंदोलनेही करण्यात आली. लातूर शहरात लातूर संघर्ष समितीच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

हे देखील पहा :

जोपर्यंत या जाचक परिपत्रकातील अटी शिथिल होणार नाहीत, तोपर्यंत नोंदणी कार्यालयातले काम सुरळीत होणार नाही, या भूमिकेतून समस्त लातूरकर एकवटले आहेत. आज लातूर संघर्ष समितीच्या वतीने माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना जाचक परिपत्रका संदर्भात निवेदन देऊन या परिपत्रकात यातील अटी किती जाचक आहेत. याची संपूर्ण माहिती लातूरकर संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली.

यावेळी माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी समस्त लातूरकर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना आपण लवकरच महसूल मंत्री यांच्याशी बैठका लावून जाचक अटी शिथिल करण्यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याच बरोबर आघाडी सरकार हे वसुली सरकार असल्याची टीका निलंगेकरांनी केली. तसेच येणाऱ्या काळामध्ये महसूल विभागातला वाझे कोण? याचा शोध घेण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी मांडले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT