मंगेश मोहिते
नागपूर : नागपूर च्या गुन्हे शाखा युनिट-3 पोलिसांनी अश्या एका आरोपीला अटक केली ज्याने बिहार पोलिसांना खुल चॅलेंज दिलं होतं. "भागलपूर के एसपी को खुला चॅलेंज ,राखा को पकड़ के दिखाओ, राखा वापस आ रहा है, हिसाब-किताब लेने के लिए - राखा तनवीर" असा मेसेज बिहार च्या भागलपूर पोलिसांना आरोपीने पाठवला.
हे देखील पहा :
या मॅसेजमुळे भागलपूर पोलिसांत खळबळ माजली, तथाकथित राखा चा हा मेसेज सगळ्या पोलीस दलात वाऱ्यासारखा पसरला! मात्र, या राखा बद्दल नागपूर च्या गुन्हे शाखा युनिट 3 च्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की बिहारच्या भागलपूर येथील काही युवक मोमीनपुरा भागात राहतात आणि ते शिवणकाम करतात. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन तपास केला असता त्यात मोहमद तनवीर मोहमद मंजूर आलम उर्फ राख हा पोलिसांना सापडला. त्याची अधिकची चौकशी केली असता बिहार पोलिसांना चॅलेंज करणारा हाच आरोपी असल्याचं पुढे आलं आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
बिहार मधील जवळपास पाच ते सहा गुन्ह्यात तो आरोपी असून फरार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून राखा नामक युवक नागपुरात लपून बसला आहे. मात्र, नागपुरात त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. भागलपूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. त्याला बिहार पोलिसांच्या हवाले करण्यात आलं. मोमीनपुरा परिसरात लपून बसलेला हा आरोपी कुख्यात हार्डकोर गुन्हेगार असून त्याने चक्क बिहार पोलिसांनाच चॅलेंज केलं. मात्र नागपूर पोलिसांसमोर मात्र त्याचा टिकाव लागला नाही.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.