Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : धाडसत्रानंतर परतताना पोलिसांची जीप नाल्यात कोसळली; ४ कर्मचारी जखमी

Rajesh Sonwane

संदीप भोसले, साम टीव्ही

लातूर : औसा तालुक्यातील उजनी परिसरात कारवाईसाठी पोलिसांची टीम गेली होती. कारवाई केल्यानंतर परतत असताना वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. गाडी अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या बंधाऱ्यात कोसळली. यात गाडीतील चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

लातूरच्या (Latur News) औसा तालुक्यातील उजनी परिसरातील चिंचोली, टाका मासूर्डी. बिरवली, एकंबी, वाडी, एकंबी तांडा येथे पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यापासून भादा पोलिसांची पथके सतत धाडसत्र टाकत आहे. अनेक गावात दारू, गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. त्यामुळे भादा पोलिसाचे चार कर्मचाऱ्यांचे पथक रविवारी पहाटे सहा वाजता एकंबी तांडा येथे कारवाई करण्यासाठी गेले होते. याठिकाणी कारवाई केल्यानंतर पथक माघारी फिरले. 

दरम्यान धाड टाकून उजनीमार्गे परत येतं असताना उजनीपासून दोन किमी अंतरावर भादा पोलिसाची जीप पलटी होऊन अपघात (Accident) झाला. त्यात भादा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आनंद शिंदे, ज्ञानेश्वर जमादार, चंद्रकांत कलमे, व शिसगर असे चार कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. उजनी येथील शेतकऱ्यांनी जखमी अवस्थेतून गाडी बाहेर काढले असून पुढील उपचरासाठी पाठवण्यात आले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada PoliticsPolitics: जरांगेंविरोधात भाजपची मराठा खेळी? जाणून घ्या मराठवाड्यासाठी BJP चा स्पेशल फॉर्म्युला

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; कोण आहेत नवीन चेहरे? वाचा

Dombivli News : राज ठाकरेंविषयी अपशब्द वापरले; मनसे कार्यकर्त्यांनी दिला रिक्षा चालकाला चोप,VIDEO

Cyclone Dana: 'दाना' चक्रीवादळ या राज्यांमध्ये धडकणार, 120 किमी वेगाने वाहणार वारे; कुठे आदळणार? वाचा

Beed Politics : पंकजा मुंडेंचा समर्थक जरांगेच्या गोटात; राजेंद्र म्हस्के बीडमधून निवडणूक लढणार? VIDEO

SCROLL FOR NEXT