लातुर- विवाहितेचे अपहरण करुन अत्याचार
लातुर- विवाहितेचे अपहरण करुन अत्याचार SaamTv
महाराष्ट्र

Latur News: धक्कादायक! विवाहितेचे अपहरण करुन अत्याचार, दोघे पोलिसांच्या ताब्यात

Gangappa Pujari

दिपक क्षिरसागर, लातूर

Latur News: विवाहितेचे अपरहरण करुन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील महिलेचे अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या विवाहितेला दोघांनी पळवून नेत तिच्यावर औशामधील लॉजवर अत्याचार केले तसेच तिला मारहाणही केली गेली असल्याची माहिती समोर आली आहे.

या धक्कादायक प्रकरणात दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जमालपूर शिवारातून एका विवाहितेला दोघांनी पळवून नेत, औशातील एका लॉजवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. यावेळी पीडित विवाहितेला मारहाणही केली आहे. याबाबत पीडित महिलेच्या तक्रारीवरून औसा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आजपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर विष्णू सूर्यवंशी आणि अनोळखी कार चालकाने जमालपूर शिवारातून एका विवाहितेचे कारमधून जबरदस्तीने पळवून नेत औसा येथील लॉजवर आणले. तिथे तिला जबर मारहाण करण्यात आली. यावेळी तिच्यावर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर, पीडित विवाहित महिलेला लातुरात सोडले. याबाबत पीडित विवाहित महिलेने रात्री उशीरा औसा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला करुन पोलिसांनी अटक केली आहे. (Latur News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

SCROLL FOR NEXT