Latur Rain Alert Saam tv
महाराष्ट्र

Latur Rain Alert : लातूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; रात्रीपासून पावसाची संततधार, जनजीवन विस्कळीत

Latur News : काल रात्रीपासून लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून पुढील काही तास सावधानतेचा इशारा देण्यात आला

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातल्या अनेक नदी नाल्यांना पूर आला असून शेती पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान लातूर जिल्ह्याला पुढील काही तास अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यात काल सायंकाळ पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. इतकेच नाही तर जिल्ह्यातील अनेक नदी- नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे

तलाव ओव्हरफ्लो झाल्याने शेतात शिरले पाणी 

जिल्ह्यातील वडवळ नागनाथ, तेलगाव, शिरूर अनंतपाळ, निलंगा या भागात पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. तर तेलगाव येथे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावातील संपूर्ण पाणी शेतामध्ये शिरत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तर निलंगा शेडोळ मार्गावरील ओढ्याला पूर आल्याने जुना पूल वाहून गेला. तर वडवळ नागनाथ येथे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. 

अतिमुसळधार पावसाचा इशारा 

कालपासून लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. तर पुढील काही तास लातूर जिल्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ये तो ट्रेलर हैं' थोड्याच वेळात राहुल गांधींकडून हायड्रोजन बॉम्ब फुटणार, काय खुलासा करणार?

Purandar Fort History: ऐतिहासिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक पुरंदर किल्ला; वाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व

Doctor Strike : पावणेदोन लाख डॉक्टर आज संपावर, आरोग्यसेवेवर मोठा परिणाम | VIDEO

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Women's health issues: धक्कादायक! ४०% महिला लैंगिक समस्यांनी त्रस्त; केवळ लाजेमुळे उपचारास होतोय विलंब

SCROLL FOR NEXT