Latur News Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Latur News: बाजार किंमतीच्‍या ३० टक्‍के कमी रकमेत चारचाकी; २० लाखांची फसवणूक

बाजार किंमतीच्‍या ३० टक्‍के कमी रकमेत चारचाकी; २० लाखांची फसवणूक

दीपक क्षीरसागर

लातूर : बाजारात असलेल्या रकमेच्या ३० टक्के कमी रकमेवर चारचाकी गाडी देतो; म्हणून (Latur) लातुरातील एकाला २० लाखाला गंडविल्याची घटना १२ ऑगस्ट २०२० ते ४ एप्रिल २०२३ या काळात घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलिस (Police) ठाण्यात ठाणे येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

लातूर येथील अनुप विजयकुमार कुलकर्णी यांना चारचाकी गाडी बाजारातील सद्यस्थितीची किंमत ही चालू रकमेच्या ३० टक्के कमीने देण्याची हमी दर्शवून गाडीची किंमत २८ लाख ३० हजार रुपये ठरविण्यात आली. हा व्यवहार ठाणे येथील निजामोद्दीन अब्दुलहुसेन सय्यद आणि रोशन यांच्यासोबत ठरला होता. पण त्यांनी (Fraud) चारचाकी गाडी दिली नाही.

जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, या व्यवहारातील यातील काही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून ९ लाख २५ हजार रुपये फिर्यादीच्या बँक खात्यावर परत आरटीजीएस केले. मात्र, उर्वरित रक्कम त्या दोघा जणांनी परत केली नाही. यासोबतच गाडीही दिली नाही. गाडीसाठी दिलेले पैसे परत न करता फसवणूक केली. शिवाय अन्यायाने विश्वासघात केला. पैसे परत मागितले असता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

SCROLL FOR NEXT