Latur Accident News:  Saamtv
महाराष्ट्र

Latur Accident: लातूर हळहळलं! गाडीवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात; बाप- लेकाचा दुर्दैवी अंत

Latur Breaking News: आज पहाटे लातूर बीड महामार्गावरील कोळगाव तांडा इथे भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये बाप- लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Gangappa Pujari

संदिप भोसले, लातूर|ता. ११ एप्रिल २०२४

Latur Accident News:

लातूर जिल्ह्यामध्ये कालपासून अपघातांचे सत्र सुरू आहे. काल लातूरच्या निलंगा- देवणी महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला, तर या अपघातात कार मधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

तर कालच्याच दिवशी उदगीरच्या लोहारा पाटी इथे नवरदेव आणि चुलत भावाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या घटना ताज्या असतानाच आज पहाटे लातूर बीड महामार्गावरील कोळगाव तांडा इथे भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये बाप- लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे (११, एप्रिल) लातूरच्या बीड महामार्गावरील कोळगाव तांडा इथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बाप- लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव कारला कट मारल्यानंतर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गाडीला कट मारल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार डिवाइडरला धडकून हा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात मल्लिकार्जुन कनडे आणि राहुल कनडे या दोन पिता पुत्रांचा जागीच मृत्यू झाला तर गाडीमधील इतर चार व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आहे.

ही धडक इतकी भीषण होती की, गाडीच्य समोरच्या भागाचा पुर्णपणे चक्काचूर झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. अपघातातील जखमींना लातूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अपघातानंतर घटनास्थळी रेनापुर पोलिसांनी पंचनामा करत पुढील तपास करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Marathon News : ठाणे मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला; घरी गेल्यानंतर स्पर्धकाचा अचानक मृत्यू

Vande Bharat Express : पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्याहून शेगावला धावणार वंदे भारत एक्सप्रेस, वाचा सविस्तर

Beed Crime : बीडमधील गुन्हेगारी संपेना! ३० वर्षीय तरुणीवर गोळीबार, थेट छातीत गोळी घुसली

Maharashtra Live News Update: डोंबिवलीत हाय प्रोफाईल सोसायटीच्या निवडणुकीत हाणामारी

Independence Day 2025 : स्वातंत्र्याच्या ज्वालेतून पेटलेला प्रगतीचा मशाल...; १५ ऑगस्टसाठी खास प्रभावशाली भाषण, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT