Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : लातूरमध्ये अवैध गर्भपाताचं प्रकरण उघड; महिलेच्या पतीसह नर्स पोलिसांच्या ताब्यात

Latur News : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील आफिया क्लिनिक होते. मात्र या ठिकाणी अवैद्यपाने गर्भपात केले जात होते.

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात अवैध गर्भपात करण्यात येत असल्याचे प्रकरण समोर आले होते. पोलीस व आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली होती. आता या प्रकरणात पीडित महिलेच्या पतीसह एका नर्सला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

लातूर जिल्ह्यातील (Udgir) उदगीर शहरातील आफिया क्लिनिक होते. मात्र या ठिकाणी अवैद्यपाने गर्भपात केले जात होते. दरम्यान या केंद्रात गर्भपात करत असल्याची माहिती पोलिस (Police) आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांसह आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकत बोगस डॉ. अरीफोदीन उर्फ इरफान मोमीन याला अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडले होते. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

पतीलाही घेतले ताब्यात 

मात्र आता या प्रकरणात क्लिनिकमध्ये मदत करणाऱ्या एका नर्सला आणि अवैध गर्भपात करण्याचे साहित्य पुरवणाऱ्या व्यक्ती अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच या प्रकरणात पीडित महिलेच्या पतीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. तर या सर्व आरोपींना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच शहरात गर्भलिंग निदान व गर्भपात करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पथक त्या दृष्टीने तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Police Bulldozer Action:नाशिकमध्ये 'उत्तर प्रदेश' पॅटर्न, बड्या राजकीय नेत्याचं साम्राज्य जमीनदोस्त; कारण काय?

Talathi Bharti: तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य, अनुभवानुसार काही जागा राखीव; राज्य सरकारचा निर्णय

किन्नरांच्या दोन गटात वाद, 1,500,000,000 रुपयांची संपत्ती; इंदूरच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण

रस्त्यावरची दहशत कमी करण्यासाठी पुण्यात भटक्या कुत्र्यांना ट्रॅक करण्याचा नवा मार्ग

Diwali Pahat: दिवाळी पहाटचा कार्यक्रम पाहायचाय? तर मुंबईतील 'या' ५ ठिकाणांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT