MSRTC Bus 
महाराष्ट्र

लातुर जिल्ह्यात बहुतांश बससेवा ठप्पच; औसा २ तर लातुरात ५ बसेस सुरू

लातुर जिल्ह्यात बहुतांश बससेवा ठप्पच; औसा २ तर लातुरात ५ बसेस सुरू

दीपक क्षीरसागर

लातुर : एसटी महामंडळाचे शासनात विलीनिकरण करावे. या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला असून आज सातवा दिवस आहे. औसा येथून २ तर लातुरातून ५ बसेस मार्गस्थ झाल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांश बसेस अद्यापही आगारात ठप्प झाले आहेत. (latur-news-bus-services-in-Latur-district-jammed-There-are-two-bus-and-five-buses-in-Latur)

उच्च न्यायालयाने सदरचा पुकारलेल्या बंद हा बेकायदेशीर असून कामावर रुजू व्हावे; असे आदेश दिले आहेत. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी कामावर रुजू होण्याचे आदेश जारी केले. मात्र निलंगा, उदगीर, औसा, अहमदपूर आणि लातुर आगारात अद्यापही एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले नाही. यामुळे एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर जिल्ह्यातील विविध आगारांना भेट देऊन कामावर रुजू होण्याच आवाहन करत आहेत. या आवाहनाला प्रतिसाद देत लातुर आगारातील ५ तर औसा आगरातुन २ बसेस मार्गस्थ झाल्या आहेत.

आगारात आंदोलन करण्यास बंदी

बंद पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आता आगराच्या हद्दीत बसून आंदोलन करण्यास बंदी घातली असून औसा आगाराच्या समोर आंदोलन करत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील हुसकावून लावले आहे. आगाराच्या रस्त्याच्याकडेला आंदोलकांनी ठाण मांडले आहे. जोपर्यंत शासनात विलीनिकरण होणार नाही; तोपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. तर एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी कामावर रुजू व्हा; अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पण आंदोलक त्याच्या मागणीवर ठाम आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT