Latur Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Latur Bribe Case : शेतकऱ्याकडून घेतली लाच; पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार एसीबीच्या जाळ्यात

Latur News : शेतातील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी शेतकऱ्याकडून २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना शेतकरी कसेतरी शेतीचा खर्च काढून आपला संसाराचा गाडा ओढत असतो. मात्र शेतकऱ्याकडून देखील पैशांची मागणी करत सदरची रक्कम स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकासह हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. 

लातूर (Latur) जिल्ह्यात हि खडबडजनक घटना घडली आहे. सदर घटनेत शेतातील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी शेतकऱ्याकडून २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे यांनी केली होती. मात्र तक्रारदार (Farmer) शेतकऱ्याने याबाबत लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा करून पथक नेमून सापळा रचण्यात आला. 

दरम्यान ठरल्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मोरे व सह पोलीस हवालदार पांडुरंग दाडगे यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडून २० हजाराची लाचेची (Bribe) रक्कम स्वीकारली. याचवेळी लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले आहे. या दोघांनाही आता एसीबीने अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळाकडून विविध संत महापुरुषांच्या पादुकांचे दर्शन

भीषण! भरधाव डंपरनं गर्भवतीला चिरडलं; अर्भक रस्त्यावर पडलं, महिलेचा दुर्देवी मृत्यू

Maharashtra Tourism: खंडाळा-लोणावळाही पडेल फिकं, कोल्हापूरमधील 'या' हिल स्टेशनला भेट द्याच

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची नवी खेळी; जितेंद्र आव्हाड यांचा कट्टर समर्थक फोडला

Ajit Pawar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर? अजित पवारांचे महत्वाचे विधान चर्चेत

SCROLL FOR NEXT