Devendra Fadnavis and Vinod Tawde Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : "देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संपवण्याचा प्लान, भाजपमधून तावडेंना पुढे आणलं जातंय"

Sushma Andhare on Devendra Fadnavis : भाजपातलेच काही लोक देवेंद्र फडणवीसांना संपवण्यासाठी नितीन गडकरी आणि विनो तावडे यांचं नाव समोर आणत आहेत, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Satish Daud

देवेंद्र फडणवीस यांना सध्या वेटिंगवर ठेवलं जात असून त्यांना राज्याच्या राजकारणातून संपवण्यासाठी भाजपाच सक्रिय झाली आहे, असा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. दिल्लीत एका तासात नवनीत राणा यांना भेट मिळते आणि फडणवीसांना वेटिंग वर ठेवलं जातं. भाजपातलेच काही लोक फडणवीसांना संपवण्यासाठी नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांचं नाव समोर आणत आहेत, असंही अंधारे म्हणाल्या. त्यांच्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूवर आम्ही जे प्रश्न विचारले होते, तेच न्यायालयाने सुद्धा विचारले आहेत. अक्षय शिंदे कोणी साधुसंत नव्हता, तो मरायलाच पाहिजे होता. मात्र, त्याला अशा पद्धतीने एन्काऊंटर केल्यामुळे अनेक सत्य बाहेर येता येतात राहिले", असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, "बदलापूर अत्याचार प्रकरणात केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केली आहे. ती याचिका फार महत्त्वाची आहे. त्यामध्ये स्पष्टपणे म्हटले की, ज्या शाळेमध्ये ही घटना घडली त्या शाळेमध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि मानवी तस्करी होत होती. या सगळ्यांशी संबंधित असणारा माणूस आपटे अजूनही फरार आहे. त्याला आणि शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा पोलिसांनी जीव घेतला".

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना मोठं विधान केलं. फडणवीसांना राज्याच्या राजकारणातून संपवण्यासाठी भाजपाच सक्रिय झाली आहे. दिल्लीत एका तासात नवनीत राणा यांना भेट मिळते, पण फडणवीसांना वेटिंग वर ठेवलं जातं. भाजपातलेच काही लोक नितीन गडकरी आणि तावडे यांचं नाव समोर आणत आहेत".

राज्याच्या राजकारणात आता देवेंद्र फडणवीस यांनी वाढवलेला भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवील की काय ही परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे यांना ज्या देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं, तेच शिंदे आता फडणवीसांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्यासाठी अनेक कृत्या चालू आहेत हे बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात येत आहे, असं वक्तव्य देखील सुषमा अंधारे यांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT