Latur Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Latur Bajar Samiti : शेतकऱ्यांच्या मुलींसाठी वसतिगृह; लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे महत्त्वपूर्ण पाऊल

Latur News : शिक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील दूरवरच्या गावांमधून शहरात शिक्षणासाठी मुली येतात. तसेच उच्च शिक्षणासाठी दूरवरून मुली येत असतात. यातील सर्वच मुलींना खासगी हॉस्टेल किंवा भाड्याची रूम करून राहणे शक्य होत नसते

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुलींना हॉस्टेलमध्ये किंवा भाड्याची खोली घेऊन राहावे लागत असते. मात्र शेतकऱ्यांच्या मुलींना यासाठीचे भाडे देणे परवडणारे असल्याने बसने अपडाऊन करावे लागत असते. अशा मुलींसाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वसतिगृह उभारण्यात आले आहे. अर्थात मुलींसाठी वसतिगृह उभारणारी लातूर बाजार समिती राज्यातील पहिली ठरणार आहे.

शिक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील दूरवरच्या गावांमधून शहरात शिक्षणासाठी मुली येत असतात. तसेच उच्च शिक्षणासाठी दूरवरून मुली येत असतात. यातील सर्वच मुलींना खासगी हॉस्टेल किंवा भाड्याची रूम करून राहणे शक्य होत नसते. यामुळे काही मुली या शाळेत किंवा महाविद्यालयात नियमित येत नाही. तर बऱ्याचशा मुली या बसने अपडाऊन करत असतात. यात अनेकदा बस वेळेवर येत नसल्याची समस्या आहे. हे सर्व लक्षात घेता लातूर बाजार समितीने वसतिगृह ऊभारणी केली आहे. 

वसतिगृहात १८० विद्यार्थ्यांची क्षमता 

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती पहिली बाजार समिती आहे; ज्या बाजार समितीने शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींसाठी सुसज्ज साधन सुविधा आणि आधुनिक पद्धतीची अभ्यासिका असणारे वस्तीगृह लातूर शहरात उभारले आहे. दरम्यान या वस्तीगृहात १८० विद्यार्थ्यांची क्षमता असणार आहे. तर या वस्तीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याचे आव्हान देखील बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यातील पहिलीच बाजार समिती 

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लातूर शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलींसाठी सुसज्ज वसतीगृह उभारण्यात आले आहे. तर शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलींसाठी उचललेले पाऊल हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने उचलले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : तुमच्याविषयी अफवा उठतील, तब्येतीची काळजी घ्या; ५ राशींच्या लोकांनी राहा सावध

Russia Alliance Opposition : घातक युती, युद्धाची सावली; चार देश एकत्र येणार,रशियाला घेरणार, VIDEO

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

SCROLL FOR NEXT