Latur Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Latur Bajar Samiti : लातूर बाजार समितीतील सौदे सुरु; १६ दिवसात बंदने १५० कोटीचा फटका

Latur News : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागच्या १६ दिवसापासून शेत मालाचे सौदे बंद झाले होते. खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे तीन दिवसात मिळावे यासाठी आडते आणि खरिदारांमध्ये वाद चालू होता

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार मागील १६ दिवसांपासून बंद असल्याने बाजार समितीला जवळपास १५० कोटीचा रुपयांचा फटका बसला आहे. मात्र १७ व्या दिवसानंतर बाजारात शेतमालाचे सौदे सुरू झाल्याने व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. मात्र खरीदार व्यापाऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

लातूर (Latur) कृषी उत्पन्न बाजार समितीत मागच्या १६ दिवसापासून शेत मालाचे सौदे बंद झाले होते. खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे तीन दिवसात मिळावे यासाठी आडते आणि खरिदारांमध्ये वाद चालू होता. दरम्यान त्यांच्या या वादामुळे मागच्या १६ दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र (Bajar Samiti) बाजार समितीने २४ तासात शेतमालाचे पैसे देण्याचे परिपत्रक काढल्यानंतर अखेर १७ दिवसानंतर बाजार समितीत शेतमालाचा सौदा निघाला आहे. 

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आडते आणि खरेदीदार यांच्यातील वादाचा फटका बाजार समितीला बसला आहे. तर यात शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मात्र १६ दिवसांनंतर बाजार समितीतील सौदे पुन्हा सुरु झाले आहेत. यामुळे शेतकरी माल आणत आहेत. बंद नंतर आजचा पहिला दिवस असल्याने या सौद्याला खरीदार व्यापाऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: शिर्डी पोलिसांनी पुन्हा घेतला भोंदू अशोक खरात याचा ताबा

LPG Rate Today : LPG सिलिंडर झाला स्वस्त! नवे दर जाहीर; तुमच्या शहरातले दर काय?

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

SCROLL FOR NEXT