Tanaji Sawant News : तर बँकांवर एफआयआर दाखल करा; पीक कर्ज वाटपावरून मंत्री तानाजी सावंतांनी दिले आदेश

Dharashiv News : धाराशिव येथे शेतकऱ्यांना पीक कर्ज अजूनही उपलब्ध झालेले नाही. या संदर्भात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज जिल्ह्यातील पिक कर्ज वाटपाचा आढावा घेत पीक कर्ज वाटपाची स्थिती जाणून घेतली
Tanaji Sawant
Tanaji SawantSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्केच पीक कर्जाचे वाटप झाले आहे. पीक कर्ज वाटपावरून आरोग्य मंत्री तानाजी सावंत चांगलेच आक्रमक झाले असून पिक कर्ज वाटपाचे टार्गेट ३१ जुलैपर्यंत पूर्ण न झाल्यास बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. 

Tanaji Sawant
Sambhajinagar News : समृद्धी महामार्गावर फिल्मी स्टाइल थरार, कारला धडक दिली, पोलिसांनी पाठलाग केला; भरधाव ट्रकमध्ये सापडलं भलतंच घबाड

धाराशिव (Dharashiv) येथे शेतकऱ्यांना पीक कर्ज अजूनही उपलब्ध झालेले नाही. या संदर्भात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज जिल्ह्यातील पिक कर्ज वाटपाचा आढावा घेत पीक कर्ज वाटपाची स्थिती जाणून घेतली. आढावा बैठकीनंतर मंत्री सावंत (Tanaji Sawant) यांनी माध्यमांशी बोलताना बँकांना हा इशारा दिला आहे. तसेच याबाबत जिल्हा प्रशासनानाला देखील आदेश दिले असल्याचे सावंत यांनी सांगितले. 

Tanaji Sawant
Beed Zp School : माजलगावमध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यालयात भरली शाळा; शिक्षक नियुक्तीसाठी ग्रामस्थ आक्रमक

धाराशिव जिल्ह्यातील बँकांना खरिपाच्या या हंगामात १ हजार ५८३ कोटी रुपये पीक कर्जापोटी (Crop Loan) वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र आतापर्यंत केवळ ७४७ कोटी म्हणजेच केवळ ४७ टक्के एवढाच पीक कर्ज या बँकांनी वाटप केल आहे. या अनुषंगाने आढावा घेत पिक कर्ज वाटपावरून तानाजी सावंत बँकांवर चांगले संतापले. ३१ जुलैपर्यंत बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न केल्यास बँकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी प्रशासनाला दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com