Latur News Saam Tv News
महाराष्ट्र

लातूरमध्ये पावसाचा हाहाकार! अनेकांचे संसार उघड्यावर; दोन गावांना पुरानं वेढलं, ७० शेळ्या, ७ बैल वाहून गेले

Latur Monsoon Rain News: लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार. बोरगाव गाव चारही बाजूंनी पाण्याखाली. जनावरं, वाहने, शेती व घरे वाहून गेली

Bhagyashree Kamble

  • लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार

  • बोरगाव गाव चारही बाजूंनी पाण्याखाली

  • जनावरं, वाहने, शेती व घरे वाहून गेली

  • वाहतुकीवर मोठा परिणाम, रस्ते व पूल बंद

राज्यात पावसानं हाहाकार माजवला आहे. लातूर जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढलं आहे. उदगीर तालुक्यातील बोरगाव गावात रात्री पुराचे पाणी शिरल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधारेमुळे अनेक ग्रामस्थांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुराच्या पाण्यात ७०, शेळ्या, ७ बैल, ५ म्हशी, २ ट्रॅक्टर आणि एक पिकअप वाहन वाहून गेले आहे. हजारो एकर शेतीचं नुकसान झालं असून, पिकांचं देखील नुकसान झालं आहे. गावातील अंगणवाडी केंद्र, घरे, किराणे, दुकाने आणि गोठे पाण्याखाली गेले आहेत.

रात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे लेंडी नदी ओसंडून वाहू लागली आहे. पुराचं पाणी धडकनाळ आणि बोरगाव या गावांमध्येही शिरलं आहे. पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच जनावरं देखील दगावली आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. उदगीर देगलूर रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. धडकनाळ येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

नागरिकांचे हाल

गावातील शेकडो नागरिकांना आपली घरे सोडून मंदिरात आश्रय घ्यावा लागला. जनावरांसह शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन, पाईपलाईन, गुरं - ढोरं, तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य वाहून गेल्यामुळे लाखोंचं नुकसान झालंय.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे आणि भाजप नेते पंडित सूर्यवंशी यांनी पुरग्रस्त भागाचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर त्यांनी तातडने मदतकार्य सुरू करण्याची मागणी केली आहे.

वाहतुकीवर परिणाम

पावसामुळे उदगीर आणि अहमदपूर तालुक्यातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक मार्गांवरील पुल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.

उदगीर - देगलूर मार्ग : करजखेल पूल बंद

उदगीर - हानेगाव मार्ग : हंगरगा गळसुबाई तांडा पूल बंद

उदगीर- होकर्णा/ बोंथी मार्ग : भवानी दापका पूल पाण्याखाली

माणकेश्वर - उदगीर मार्ग : इंद्रराळ पूल पाण्याखाली

अहमदपूर - अंधोरी मार्ग : मुसळधार पावसामुळे बंद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT