Latur woman burnt alive case Saam TV
महाराष्ट्र

लातूर हादरले! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले; अमानुष कृत्यामागील कारण वाचून चीड येईल

Latur woman burnt alive case : लातूरच्या उदगीरमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना. ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

संदीप भोसले | लातूर प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Latur crime, Udgir murder case : लातूरच्या उदगीर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने आपल्याच पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या भीषण घटनेत गंभीर भाजल्यामुळे तस्लिम शफी कुरेशी (वय ३६) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कुरेशी कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. आज या वादाने उग्र रूप धारण केले. आरोपी पतीने रागाच्या भरात तस्लिम यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना थेट पेटवून दिले, असा गंभीर आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून महत्त्वाचे पुरावे संकलित केले आहेत. या प्रकरणी मयत महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अमानुष कृत्यामागील नेमके कारण काय होते, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

परिसरात खळबळ आणि संताप

या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण उदगीर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एका क्षुल्लक घरगुती वादाचे पर्यवसान थेट अशा अमानुष हत्येत झाल्याने कुरेशी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी चक्रा फिरवली असून, त्यांना कडक शिक्षा करण्याची मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: गणेशोत्सवाला विरोध नाहीच, हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया, कोणकोणत्या मुद्द्यावर काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: अमरावती शहरातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची हत्या

Dahi Handi 2026: दहीहंडी फोडण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली? गोविंदा मानवी मनोरे का रचतात? इतिहास जाणून घ्या

GDS Bharti 2026: १० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; लगेच जाणून घ्या प्रोसेस

280 निवडणुका लढवणाऱ्या ज्येष्ठ नेत्याचं निधन; इंदिरा गांधींपासून वाजपेयी-आडवाणींपर्यंत दिग्गजांविरोधात दिली होती लढत, राजकारणात शोककळा

SCROLL FOR NEXT