Latur Hostel News  Saam tv
महाराष्ट्र

Latur : जेवणात आढळलं झुरळ, तर पिण्याच्या पाण्यात शेवाळ; लातुरमधील विद्यार्थ्याच्या आरोग्याशी खेळ; VIDEO व्हायरल

Latur Hostel News : लातूरमधील वस्तीगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात झुरळ आणि पिण्याच्या पाण्यात शेवाळ आढळल्याने गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Alisha Khedekar

  • लातूर वस्तीगृहात अन्नात झुरळ आणि पाण्यात शेवाळ आढळले

  • सुमारे १००० विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका

  • निकृष्ट दर्जाच्या जेवणावर विद्यार्थ्यांचा संताप

  • प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी

संदीप भोसले, लातूर

पुण्यातील शासकीय वस्तीगृहातील अशुद्ध पाणी पिऊन काही दिवसांपूर्वी मुलांना विषबाधा झाली होती.हे प्रकरण ताजे असतानाच लातूर जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात झुरळ, तर पाण्यात शेवाळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आरोग्याbabt प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, लातूर शहरातील १२ नंबर पाटी परिसरातील सुमारे १००० मुला-मुलींच्या वस्तीगृहात विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणात झुरळ आढळल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

तसेच मुलींच्या वस्तीगृहात पिण्याच्या पाण्यात शेवाळ साचल्याचेही समोर आले असून, हा गंभीर प्रकार विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. दरम्यान या सर्व प्रकारामुळे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून होत आहे.

पिंपरी-चिंचवड मधील मोशी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील दूषित पाणी प्यायल्याने विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, जुलाब आणि मळमळ असा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने सर्व विद्यार्थ्यांना तातडीने भोसरी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT