Latur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Latur News : थंडी वाजू लागली म्हणून पठ्ठ्या थेट रेल्वेखाली झोपला; भयानक घटना घडणार होती इतक्यात...

लातूरच्या रेल्वेस्टेशन परिसरातून एक अजब घटना उघडकीस आली आहे. एका 59 वर्षीय व्यक्तीला थंडी वाजू लागल्याने तो थेट प्लॅटफॉमजवळील रेल्वेरुळावर झोपला

दिपक क्षीरसागर

Latur News : लातूरच्या रेल्वेस्टेशन परिसरातून एक अजब घटना उघडकीस आली आहे. एका 59 वर्षीय व्यक्तीला थंडी वाजू लागल्याने तो थेट प्लॅटफॉमजवळील रेल्वेरुळावर झोपला. त्याचवेळी लातूर-मुंबई एक्सप्रेस (Latur) रुळावरून जात होती. ही बाब लक्षात येताच रेल्वेकर्मचाऱ्यांनी रेल्वे थांबवून या व्यक्तीला बाहेर काढलं. विशेष म्हणजे रुळावरून रेल्वे गेल्यानंतरही या व्यक्तीला साधं खरचटलं सुद्धा नाही. (Latest Marathi News)

सोनकांबळे पुंडाजी लिंबाजी असं या नशीबवान बहाद्दराचं 59 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. गुरूवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. प्राप्त माहितीनुसार, गुरूवारी रात्री लातूर रेल्वे स्टेशनवर लातुर -मुंबई एक्स्प्रेस गाडी उभी होती. ही गाडी मुंबईकडे जाण्यासाठी सुरू झाली.

काही अंतरावर पुढे गेली. त्या वेळी अचानक एक 59 वर्षीय इसम थेट या रेल्वेरुळावर (Crime News) जाऊन झोपला. हे तिथे उपस्थित असलेल्या काही प्रवाशी व रेल्वे कर्मचाऱ्यानी पाहिलं. त्यांनी तातडीने रेल्वे थांबवून या व्यक्तीला रेल्वेखालून बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे या इसमाला साधं खरचटलंही नव्हतं. नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला असेच म्हणावं लागेल.

आश्चर्याची बाब म्हणजे, जेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला रेल्वेरुळावर का झोपला असं विचारलं असता, थंडी वाजू लागली म्हणून गेलो असं अजब उत्तर त्यांनी दिलं. या संपूर्ण प्रकारानंतर परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, या सर्व प्रकारनंतर रेल्वेखाली झोपलेल्या या बहाद्दराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT