Crime News Saam tv
महाराष्ट्र

किरकोळ कारणावरून पत्नीचा गळा चिरला, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

या संदर्भात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर - घरातील किरकोळ कारणावरुन पतीने पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरल्याची घटना शहरातील सोनानगर परिसरात घडली. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून या संदर्भात एमआयडीसी पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

शहरातील सोनानगर येथे माहेर असलेल्या अंकिता प्रविण जाधव यांचे गतवर्षीच लग्न झालेले होते. मागील वर्षभरापासून पुणे येथे वास्तव्यास असलेले हे जोडपे ४-८ दिवसांपूर्वी लातुरात सोनानगर येथे भाड्याने राहात होते. पती प्रविण जाधव हा दारू पिवून त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला आणि यावेळी त्याने घरातील धारदार चाकूने वार करुन पत्नीचा गळा चिरला.

त्यांच्या आरडाओरड करण्यामुळे शेजारील लोक गोळा झाल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. गंभीर जखमी अवस्थेत अंकिता यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update अमरावतीत 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच आई...; ठाण्यातील खळबळजनक घटना|VIDEO

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

MNS : मराठी असूनही ते एका मराठी मुलीलाच टार्गेट करत आहेत, मनसे नेत्याच्या मुलाकडून शिवीगाळ; इन्फ्लूएन्सरने सांगितली आपबिती

Blood Pressure: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी वरदान ठरेल 'ही' एक गोष्ट

SCROLL FOR NEXT