लातूर : बायकोसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने मित्रानेच मित्राची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर मृतदेह एका चादरीत गुंडाळून तो नदीत फेकून दिला. विशेष म्हणजे दोन दिवसानंतर आरोपीने स्वत: पोलीस ठाण्यात येऊन खूनाची कबूली दिली. लातूर (Latur) जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
राम कुमदळे असं हत्या झालेल्या (Crime News) व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुग्री कांबळे नामक व्यक्तीला अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, सुग्रीव हा चाकूर तालुक्यातील ब्रम्हवाडी परिसरात राहतो. त्याची आटोळा येथील रहिवाशी असलेल्या राम कुमदळे याच्यासोबत घट्ट मैत्री होती. दोघांनी मिळून काही दिवसांपूर्वी आयशर टेम्पो खरेदी केला होता. हाच टेम्पो हे दोघे भाड्याने चालवत होते.
एकमेकांच्या घरी येणे जाणे असल्यामुळे राम कुमदळे याचे आणि सुग्रीव कांबळे याच्या बायकोची जवळीक निर्माण झाली होती. त्यातून या दोघांचे अनैतिक संबंध वाढले. राम कुदळे हा सतत सुग्रीवच्या बायकोला फोनवर बोलत असल्यामुळे सुग्रीवचा हा संशय पक्का झाला होता. त्यातच काही दिवसांपूर्वी टेम्पोच्या भाड्याचे पैसे का खर्च केले यावरुन रामने सुग्रीवच्या घरी बायकोला शिविगाळ केली होती. हे दोन्ही राग सुग्रीवच्या डोक्यात बसले होते.
त्यामुळे त्याने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रामला गोड बोलून आपल्या आयशर टेम्पोत बसवले आणि लातूर शहरातील रिंगरोडवर असलेल्या गोजमगुंडे यांच्या मळ्याजवळ रिंगरोडच्या कडेला टेम्पो उभा केला. यावेळी, सोबत आनलेल्या चाकुने पोटात आणि तोंडावर गंभीर वार करुन त्याचा टेम्पोमध्येच हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रामचा मृतदेह चादरित दगडासह बांधून चामेवाडी येथील मांजरा नदीच्या पात्रात टाकून दिला.
दरम्यान, या हत्येसंदर्भात कुणालाही माहिती नव्हती. मात्र, दोन दिवसानंतर आरोपी सुग्रीव हा स्वतः विवेकानंद चौक पोलिसांत हजर झाला. आपणच मित्राची हत्या करून त्याचा मृतदेह नदीत फेकून दिल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस मृत रामचा मृतदेह शोधत आहेत.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.