Latur Crime, pune, brother, police saam tv
महाराष्ट्र

Crime News : भावाला मारण्यासाठी पुण्यातून पिस्तूल कोठून खरेदी केले ? पाेलिस तपास सुरु

पाेलिसांनी घटनेचा कसून तपास केल्याने खूनाचा उलगडा झाला.

दीपक क्षीरसागर

Latur Crime News : एका तरुणाची (youth) डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची घटना लातूर (latur) तालुक्यातील भातखेडा येथे समोर आली. दरम्यान या हत्येचा लातूर ग्रामीण पोलिसांनी (police) उलगडा केला. कुटुंबीयांना सतत छळणाऱ्या सूरजवर सख्ख्या भावानेच गोळी झाडल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यास अटक (arrest) करुन न्यायालयात (latur court) हजर केले असता त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी (police custody) सुनावली आहे.

दारूच्या आहारी गेलेला मोठा भाऊ आणि घरात आजारी वडील, आई, अपंग बहिणीला मानसिक-शारीरिक त्रास देत असल्याने वैतागलेल्या लहान भावानेच मोठा भाऊ सूरज याच्या डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या केली. याप्रकरणी मयत तरुणाच्या लहान भाऊ धीरजला पोलिसांनी अटक केली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गोविंद रामकृष्ण मुळे यांचा मुलगा सूरज हा मजुरी करत असे. शिवाय, तो दारूच्या आहारी गेला होता. सतत दारू पिऊन घरातील बहीण, आई, भावाला छळत होता. या छळाला कंटाळून लहान भाऊ धीरज याने आई आणि बहिणीला सोबत घेऊन पुण्याला रोजगारासाठी गेला. (Maharashtra News)

परिणामी, भातखेडा येथे गोविंद मुळे आणि मुलगा सूरज हे दोघेच राहत होते. दरम्यान धीरज याने सूरजला मारण्यासाठी पुण्यातून (pune) पिस्तूल कोठून खरेदी केली याचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेमुळे मुळे कुटुंबियांना माेठा धक्का बसला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

Satara Fire : धाड धाड धाड...! साताऱ्यात भर बाजारपेठत एकावर गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: अजित पवारांवर टीका; आमदाराकडून संजय राऊतांची जीभ हासडण्याची भाषा

शनिशिगणापूरनंतर शिर्डीत ऑनलाईन गंडा,शिर्डी संस्थांनच्या नावानं बोगस वेबसाईट

SCROLL FOR NEXT