Latur Muncipal Corporation News : 'या' तारखेपर्यंत थकीत कर भरा, व्याज माफी मिळवा; लातूर महापालिकेची याेजना

एक रकमी मालमत्ता कराचा भरणा मालमत्ताधारकांनी करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.
latur, muncipal corporation, house tax
latur, muncipal corporation, house taxsaam tv
Published On

Latur Muncipal Corporation : लातूर (latur) शहरांतील ९८ हजार पेक्षा अधिक मालमत्ताधारक आहेत. त्यांच्याकडे ९५ कोटींचा मालमत्ता कर थकलेला आहे. या कराची वसुली करण्यासाठी महापालिका (latur muncipal corportation) प्रशासनाने मालमत्ता कराच्या (house tax) व्याजात १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

latur, muncipal corporation, house tax
Accident News : शेगावला निघालेल्या भाविकांच्या कारला निंबाफाट्यावर अपघात, एक ठार, चार जखमी

ही सवलत घेण्यासाठी मालमत्ताधारकांना थकीत कर एकरकमी भरावा लागणार आहे. १७ फेब्रुवारीपर्यंतच शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत देण्याची मुदत राहणार आहे. लातूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ९८ हजारांच्यावर मालमत्ताधारकांची संख्या आहे. या मालमत्ताधारकांकडे ९५ कोटी ७० लाख ७२ हजार ५९३ रुपयांची थकबाकी आहे.

latur, muncipal corporation, house tax
Maharashtra Congress : महाराष्ट्र काॅंग्रेस चिंतेत... बाळासाहेब थाेरातांच्या राजीनाम्यानंतर अशाेक चव्हाण म्हणतात आम्ही...

गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या चारही झोनच्या पथकांकडून वसुली मोहीम सुरू आहे; परंतु मालमत्ताधारकांकडून तितकासा प्रतिसाद मिळत नाही. कायद्याचा धाक दाखवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने महानगरपालिका प्रशासनाने थकीत मालमत्ता करावर असलेल्या व्याजात शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

एक रकमी मालमत्ता कराचा भरणा मालमत्ता धारकांनी केला तर त्यांना ४५ कोटी रुपयांचे व्याज माफ होणार आहे. मनपा प्रशासनाने १७ फेब्रुवारीपर्यंत या सवलतीचा फायदा घ्यावा असे आवहान केले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com