latur shocking news x
महाराष्ट्र

प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय; गळफास घेत दोघांनी आयुष्य संपवलं

Latur News : लातूर शहराजवळ दोघांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलास आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरु केला आहे.

Yash Shirke

  • घरच्यांच्या विरोधामुळे प्रेमी युगुलाने गळफास घेत आत्महत्या केली.

  • दोघेही बीड जिल्ह्यातील रहिवासी असून अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात होते.

  • पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

संदीप भोसले, साम टीव्ही, प्रतिनिधी

Latur Crime : लातूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमसंंबंधांना विरोध केल्याने लातूरमध्ये एका प्रेमी युगुलाने गळफास घेत आत्महत्या केली. लातूर शहराजवळ असणाऱ्या पेठ गावच्या शिवारात ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर शहराच्या ४ किलोमीटरवर असलेल्या पेठ गावच्या शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये प्रेमी युगुलाने गळफास घेत जीवन संपवले. दोघेही बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी येथील रहिवाशी असल्याचे म्हटले जात आहे. नात्याला घरच्यांचा विरोध असल्याने दोघांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

तरुणी ही लातूर येथील एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होती. तर तिचा प्रियकर हा लातूरच्या अहमदपूर येथे एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो शारीरिकदृष्ट्या अपंग आहे. दोघेही अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात होते, तरुणी आणि तिचा प्रियकर दोघेही भावकीत होते. त्यांच्या प्रेमसंबंधाला घरच्यांचा प्रचंड विरोध होता.

भावकीमध्ये असल्याने आणि तरुण शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याने तरुणीच्या घरातून प्रेमाला, लग्नाचा विरोध सुरु होता. याशिवाय तरुणाच्या कुटुंबीयांनाही ही गोष्ट मान्य नव्हती. कायमच एकत्र राहण्यासाठी दोघांनी टोकाचे पाऊल उचलले. या आत्महत्या प्रकरणाचा तपास लातूर ग्रामीण पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत आहेत. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

राधाकृष्ण विखेंची गाडी फोडल्यास १ लाखाचं बक्षीस! बच्चू कडूंचा संतापजनक इशारा

Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

SCROLL FOR NEXT