लातूर: लातूर (Latur) शहराचे महापौर विक्रांत गोजमगुंडे (Vikrant Gojamgunde) यांना २०२२ चा सर्वोत्तम ओबीसी (OBC) राज्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. बंगळूरच्या एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कर्नाटक काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आमदार ईश्वर खंड्रे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (latur city mayor Vikrant Gojamgunde awarded Best OBC Ruler National Award in bangalore)
हे देखील पाहा -
बंगळूरच्या डी. देवराज अर्स भवन सभागृहात आयोजित केलेल्या अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या द्वितीय राष्ट्रीय अधिवेशनात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. देशभरातील दहा राज्यातील सुमारे दीड हजार प्रतिनिधींचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या वतीने राजेंद्र वनारसे यांनी केले होते.
लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे हे बऱ्याच काळापासून सातत्याने ओबीसी चळवळीत कार्यरत राहिलेले आहेत. महाराष्ट्र राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण स्थगित झाल्यानंतर त्यांनी राज्यस्तरावर आंदोलनात सहभाग घेतला होता. लोणावळा येथील पार पडलेल्या पहिल्या आंदोलन मेळाव्यात त्यांच्या भाषणाने त्यांनी सर्वांना प्रभावीत केले होते. लातूर येथे देखील जिल्ह्यातील सर्व पक्षातील पदाधिकारी यांना एकत्रित करत राज्यातील सर्वात लक्षणीय ठरलेल्या ओबीसी आरक्षण बचाव मेळावा यशस्वी करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.